नेटफ्लिक्सचे नवीन फिचर, आता आपोआप डाऊनलोड होतील चित्रपट आणि शोज

| Updated on: Feb 23, 2021 | 8:09 PM

नेटफ्लिक्सचे नवीन फिचर, आता आपोआप डाऊनलोड होतील चित्रपट आणि शोज (Netflix's new feature, movies and shows will now be downloaded automatically)

नेटफ्लिक्सचे नवीन फिचर, आता आपोआप डाऊनलोड होतील चित्रपट आणि शोज
नेटफ्लिक्सने भारतीय वापरकर्त्यांसाठी लाँच केले खास फीचर
Follow us on

मुंबई : नेटफ्लिक्सने सोमवारी एक नविन फिचरची घोषणा केली असून ‘Downloads for You’असे या फिचरचे नाव आहे. हे फिचर स्मार्ट डाऊनलोड फिचरला रिप्लेस करेल. हे फिचर आता जगभरातील अँड्रॉईड युजरसाठी उपलब्ध झाले असून नंतर आयओएसला उपलब्ध केले जाईल. वापरकर्त्यांना सहजपणे नवीन कंटेन्ट शोधण्यासाठी आणि लवकर पाहता यावा यासाठी नेटफ्लिक्सचा हा प्रयत्न आहे. (Netflix’s new feature, movies and shows will now be downloaded automatically)

डेटा लिमिट निवडू शकता

स्मार्ट डाउनलोड्स फिचरमध्ये तुम्ही पाहिलेला एपिसोड आधी जिलिट करावा लागतो त्यानंतरच पुढील एपिसोड डाऊनलोड होतो. म्हणजेच यामध्ये चित्रपट डाऊनलोड होऊ शकत नाही. नवीन फिचरमध्ये यात अपडेट केले असून नवा कंटेन्ट डाऊनलोड करु शकता, तसेच चित्रपटही डाऊनलोड करु शकता. नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार युजरच्या पसंतीनुसार कंटेन्ट आपोआप डाऊनलोड होईल. नेटफ्लिक्सच्या मदतीने, डाउनलोड्स फॉर यू फिचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या पसंतीनुसार डेटा मर्यादा निवडू शकतात. फिचर इनेबल करताना 1GB, 3GB किंवा 5GB पर्यंत डाऊनलोड करण्याचे पर्याय असतील. या फिचरच्या माध्यमातून युजर्स जे डाऊनलोड करतील ते विना इंटरनेटही युजर्स पाहू शकतात. ही दोन स्टेप्सची प्रक्रिया असल्याचे नेटफ्लिक्सने सांगितले.

कसे कराल फिचर डाऊनलोड?

1. प्रथम डाऊनलोड टॅबवर जा आणि Downloads for You वर क्लिक करा.
2. यानंतर आपल्याला जी अमाऊंट डिव्हाईसवर डाऊनलोड करायची आहे ती निवडा. (1GB, 3GB किंवा 5GB)
3. शेवटी टर्न ऑनवर क्लिक करा

लवकरच आयओएसवर उपलब्ध होणार

नेटफ्लिक्सने सांगितले की, ते लवकरच आयओएसवरील फिचरची चाचणी सुरू करतील. आयफोन आणि आयपॅडवर याच्या उपलब्धतेच्या वेळमर्यादेबाबत सांगण्यात आले नाही.

नेटफ्लिक्स काय आहे?

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि हॉटेल स्टारसारखे व्हिडिओ स्ट्रिमिंग फिचर आहे. ही अमेरिकन कंपनी आहे. यूजर्स इंटरनेटकडून कनेक्ट केलेल्या डिव्हाईसवर टीव्ही शोज, मुव्हिज, डॉक्युमेंट्रीज इत्यादी पाहू शकतात. ही पेड स्ट्रिमिंग प्रेम आहे. भारतीय ग्राहकांना कंपनीचे तीन प्लान उपलब्ध आहेत. भारतमध्ये फिल नेटवर्क नेटफ्लिक्सचे एक लाखो युजर्स आहेत. (Netflix’s new feature, movies and shows will now be downloaded automatically)

 

इतर बातम्या

पीएफचा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार; नोकरदारांवर परिणाम काय?

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा जबरदस्त प्लॅन; 5 जी मध्ये सर्वात वेगवान इंटरनेटचा दावा