New Mobile Rules : 1 सप्टेंबरपासून नवीन नियम, ही सिमकार्ड्स काळ्या यादीत जाणार, तुमचा नंबर तर नाही ना?

| Updated on: Aug 19, 2024 | 10:45 PM

केंद्र सरकारने स्पॅम कॉल किंवा फ्रॉड कॉलबाबत अधिक कठोर होण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने ( TRAI ) नवीन नियम घेतले असून येत्या 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत...

New Mobile Rules : 1 सप्टेंबरपासून नवीन नियम, ही सिमकार्ड्स काळ्या यादीत जाणार, तुमचा नंबर तर नाही ना?
Follow us on

केंद्र सरकारने स्पॅम कॉल किंवा फ्रॉड कॉलबाबत अधिक कठोर निर्णय घेण्याची तयारी केलेली आहे. त्यामुळे सरकारी संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया ( TRAI ) मोबाईल नेटवर्क संदर्भात नवीन नियम आणले असून ते येत्या 1 सप्टेंबर 2024 पासून देशभर लागू होणार आहेत. हे नियम लागू झाल्यानंतर अन वॉण्टेड कॉलपासून सर्वसामान्य ग्राहकांची सुटका होणार आहे. या संदर्भात सूचना ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना देखील पाठविलेल्या आहेत.

नवीन नियम नेमके काय ?

जर तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन टेलिमार्केटिंग केले तर तुमचा मोबाईल क्रमांक दोन वर्षांसाठी ब्लॅक लिस्ट केला जाणार आहे. कारण आता टेलिमार्केटिंग करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम मंत्रालयाने नवीन मोबाईल नंबर सिरीज जारी केलेली आहे. टेलिकॉम कम्युनिकेशन विभागाने नवीन 160 नंबर सिरीज फायनान्शिय फ्रॉड रोखण्यासाठी जारी केली आहे. त्यामुळे या स्थितीत आता बँकींग सेक्टर आणि इन्शुरन्स सेक्टर याच 160 क्रमांकाच्या मोबाईल क्रमांकाच्या सिरीजवरुन त्यांचे प्रमोशनल कॉल किंवा मॅसेज ग्राहकांना करु किंवा पाठवू शकणार आहेत.

अशा प्रकारचे कॉल आणि मॅसेजना बंदी

नवीन नियम लागू झाल्यानंतर नवीन नियम लागू झाल्यानंतर अन वॉण्टेड कॉल्स आणि मेसेजच्या समस्येपासून सुटका होऊ शकेल,असे मानले जात आहे. कारण नवीन नियमाप्रमाणे आपोआप तयार होणारे कॉल्स आणि मेसेज देखील समाविष्ट केलेले आहेत, ज्या कॉलना रोबोटिक कॉल आणि मॅसेज देखील म्हणतात. येत्या 1 सप्टेंबरपासून अशा सर्व कॉल्स आणि मेसेजवर बंदी घालण्यात येईल असे सरकारने म्हटले आहे.
तुम्ही अन वॉण्टेड कॉलची तक्रार करु शकता..

तुम्हाला तक्रार करता येणार

टेलिकम्युनिकेशन विभागाच्या आकडेवारीप्रमाणे गेल्या तीन महिन्यात दहा हजार फ्रॉड मॅसेज ग्राहकांना अशा प्रकारे सिमकार्डचा दुरुपयोग करुन पाठविण्यात आले आहेत. तुम्हाला जर असा मॅसेज आला असेल तर त्याची तक्रार तुम्हाला करता येणार आहे. जर एखाद्याने 10 आकडी मोबाईल क्रमांकावरुन तुम्हाला फ्रॉड संबंधी मॅसेज पाठविला असेल किंवा कॉल केला असेल तर संचार साथी पोर्टलवर (Sanchar Sathi Portal) तुम्ही त्याची तक्रार करु शकता. तसेच या दहा आकडी मोबाईल क्रमांकावरुन फ्रॉडचा संदेश पाठविला असेल तर तुम्ही थेट 1909 या हेल्पलाईनला देखील तक्रार करू शकता.

तक्रार कशी करायची  ?

तुम्ही तक्रार करण्यासाठी  sancharsathi.gov.in या वेबसाईटवर जा, आणि सिटीझन सेन्ट्रीक सर्व्हीस या ऑप्शन स्क्रोल करा.

त्यानंतर टॅबच्या खाली दिलेला पर्याय निवडा आणि नंतर रिपोर्टिंगवर क्लिक करा.

यानंतर, ड्रॉप-डाऊन मेनूमधून फसवणूक कॅटगरी निवडा आणि फसवणूक कॉलचा स्क्रीनशॉट अॅटॅच करा.

त्यानंतर ज्या मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला फसवणूक कॉलचा मॅसेज आला आहे तो मोबाईल क्रमांक टाका.

फसवणूक कॉलची तारीख आणि वेळ देखील नमूद करा आणि त्याची तक्रार करा.

नंतर तुमचा तपशील नमूद करा. मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि तक्रार सबमिट करा.