NFT चा फुगा फुटला? Jack Dorsey च्या कोटींच्या ट्विटवर केवळ काही हजारांची बोली…

| Updated on: Apr 15, 2022 | 4:52 PM

जॅक डॉर्सीच्या पहिल्या ट्विटचा NFT सुमारे 22 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला होता. ते आता लिलावासाठी ठेवण्यात आले होते आणि हा एनएफटी 50 मिलियन डॉलर्समध्ये विकला जाईल अशी अपेक्षा होती. पण, त्याची सर्वोच्च बोली फक्त $280 इतकी लागल्याने खरेदीदाराला मोठा धक्का बसला आहे.

NFT चा फुगा फुटला? Jack Dorsey च्या कोटींच्या ट्विटवर केवळ काही हजारांची बोली...
Jack Dorsey
Follow us on

मुंबई : एनएफटीबद्दल (NFT) खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. पहिला NFT संग्रह CryptoPunks सध्या 1,50,000 डॉलर्सपेक्षा जास्त किमतीत विकला जात आहे. ज्यांनी बोरड अ‍ॅप यॉट क्लब एका वर्षापूर्वी 250 डॉलर्सला विकत घेतला ते आता त्याचे NFTs 3,00,000 डॉलर्सपेक्षा जास्त किमतीत विकू शकतात. परंतु, ते नेहमीच फायदेशीर राहत नाही. गेल्या वर्षी, क्रिप्टो उद्योजक (Crypto Entrepreneur) सिना एस्टावी यांनी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सीचे (Jack Dorsey) पहिले ट्विट $2.9 दशलक्षमध्ये NFT विकत घेतले. सिना एस्तावी यांनी ते 7 दिवसांसाठी NFT लिलावात ठेवले. याबाबत त्यांनी ट्विट केले होते की, या बोलीतून मिळालेल्या $50 मिलियन्सपैकी निम्मी रक्कम ते दान करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु, जेव्हा कोटीमध्ये विकत घेतलेले (Purchased) एनएफटीची सर्वात जास्त बोली केवळ $280 (जवळफास 21,000 रुपये) होती. CoinDesk ने याबाबत माहिती दिली.

दरम्यान, Estavi NFT मार्केटप्लेस OpenSea ज्या प्रकारे कार्य करते ते लागलेली बोली स्वीकारू किंवा नाकारू शकतात. त्यामुळे क्रिप्टो उद्योजक सिना एस्टावी यांनी आपण आणखी लिलावासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. आता त्याची बोली $4631 वर गेली आहे. लिलाव संपेपर्यंत त्याची बोली आणखी वाढेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. तथापि, त्याची किंमत $2.9 दशलक्ष (22 कोटी रुपये) पर्यंत जाणे अशक्य असल्याची चर्चा आहे. इस्टावीने बोली सुरू होण्यापूर्वी अंदाज व्यक्त केला होता की त्याची बोली $50 दशलक्षपर्यंत जाऊ शकते. त्याने CoinDesk ला सांगितले की त्याने सेट केलेली अंतिम मुदत संपली आहे. परंतु, एखादी चांगली ऑफर असल्यास, ते ते स्वीकारू शकतात किंवा ते एनएफटी न विकता आपल्याजवळच ठेवतील.

काय आहे NFT?

NFT चा अर्थ होतो Non Fungible Token. ही एकप्रकारची डिजिटल संपत्ती आहे. याला ब्लॉकचेन टेक्नोलॉजीद्वारे हाताळले जाते. या टेक्नोलॉजीच्या मदतीने जीआयएफ, फोटो, व्हिडिओ क्लिप्स, पेटिंग व अन्य किंमत डिजिटल संपत्तीचा मालकी हक्क निश्चित होतो. या सर्व गोष्टी सध्या डिजिटल संपत्ती आहेत व याची खरेदी-विक्री देखील डिजिटल स्वरुपातच होते. थोडक्यात तुम्ही तुमच्या डिजिटल वस्तूंचा लिलाव करू शकता व याची खरेदी-विक्री क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होते.

इतर बातम्या

वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी

GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना

Textile | कापड उद्योगाला सरकारचे पाठ’बळ’ ! प्रोत्साहन योजनेत 61 प्रस्तावांना मंजुरी; 2.4 लाख नोकऱ्यांचा राजमार्ग तयार