मुंबई : कॅमेरा म्हटलं की निकॉन नाव समोर यायचं. निकॉनचा डीएसएलआर कॅमेरा जुन्या पिढीकडे अजूनही आहे. फोटोग्राफर्स देखील या कॅमेऱ्याला जपून ठेवतात. कारण, यासोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत, मात्र, निकॉन कंपनी (Nikon) नवीन डीएसएलआर (DSLR) कॅमेरे (Camera) बनवणार नाही, असा एक अहवाल आलाय. ऐकूण आश्चर्य वाटलं ना, ही फोटोग्राफर्ससाठी वाईट बातमी असली तरी त्या अहवालानुसार हे सत्य आहे. या बातमीमुळे जगभरातील छायाचित्रकारांना धक्का बसू शकतो. Nikon साठ वर्षांहून अधिक काळापासून डीएसएलआर कॅमेरे बनवत आहे. आता कंपनी त्याऐवजी पुढच्या पिढीतील मिररलेस कॅमेऱ्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचंही त्या अहवालात नमुद आहे. पण, जुन्या शैलीतील SLR कॅमेऱ्यांच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी नाही. कारण, अजूनही तोच कॅमेरा अनेकांच्या हातात बसलाय. दुसरा कॅमेरा जुनी पिढी हातातही घेत नाही. मात्र, आता नव्या पिढीसाठी निकॉन मिररलेस कॅमेरा आणणार असल्याचं त्या अहवालात नमुद करण्यात आलंय.
ही माहिती Nikkei Asia च्या अहवालातून आली आहे आणि Nikon ने याची पुष्टी केलेली नाही. निकॉनने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे. निकॉनने सांगितले की, आमच्याकडे एसएलआर काढण्याबाबत एक मीडिया लेख होता. हा मीडिया लेख केवळ अनुमान आहे आणि Nikon ने या संदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. Nikon डिजिटल SLR चे उत्पादन, विक्री आणि सेवा सुरू ठेवतो. त्यामुळे निकॉन डीएसएलआर कॅमेऱ्यांची विक्री सुरूच राहणार आहे.
निकॉन नवीन SLR मॉडेल विकसित करेल याची पुष्टी करत नाही. त्यामुळे अजूनही एक प्रकारचं संभ्रम आहे. दुसरीकडे, Nikkei Asia अहवालानं असंही सुचवलंय की, नवीन SLR मॉडेलचे उत्पादन थांबेल. कंपनीनं विद्यमान SLR मॉडेलचे उत्पादन आणि विक्री सुरू ठेवली आहे. Nikon SLR कॅमेरा 2020 मध्ये आला आणि तेव्हापासून कोणतेही नवीन मॉडेल आलेले नाही. कंपनीने काही काळापूर्वी आपले Nikon D3500 आणि Nikon D5600 कॅमेरे देखील बंद केले आहेत.
रिपोर्टनुसार, प्रतिस्पर्धी कॅमेरा कंपनी कॅनन देखील असेच करेल. Nikon आणि Canon दोन्ही आता मिररलेस कॅमेर्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. ज्यांची लोकप्रियता वाढत आहे. मिररलेस कॅमेरे हे अवजड DSLR कॅमेर्यांपेक्षा हलके आणि अधिक कॉम्पॅक्ट असतात आणि जवळपास SLR कॅमेर्यांसारखेच कार्य करतात. मात्र, या कॅमेऱ्यांना सर्वात मोठा धोका स्मार्टफोनचा आहे. स्मार्टफोन कॅमेर्यांमुळे पॉइंट-अँड-शूट डिजिटल कॅमेरे बंद झाले आहेत.