नवी दिल्ली : फोन (Phone) घ्यायचाय, तोही स्वस्त हवा, दमदार म्हणजेच अधिक फीचर्स (Phone Features) असणारा आणि ब्रॅडेड कंपनीचा हवा, या सर्व प्रश्नांचीस उत्तर आम्ही तुम्हाला या विशेष बातमीत देणार आहोत. तुम्हाला स्वस्त देखील मोबाईल मिळेल आणि त्यात फीचर्स देखील आधीच असतील. चला तर पाहुया. स्मार्टफोन ब्रँड नोकियानं (Nokia) आपला नवीन फीचर फोन Nokia 8210 4G भारतात लाँच केला आहे. नोकियानं नोकिया 8210 4G दोन कलर व्हेरिएंट आणि ड्युअल सिम सपोर्टसह बाजारात आणला आहे. फोन सीरीज 30+ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 3.8-इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. नोकिया 8210 4G ब्लूटूथ V5 च्या समर्थनासह नोकियाच्या लोकप्रिय स्नेक गेमला देखील समर्थन देतो. या फोनमध्ये तुम्हाला कोणते स्पेसिफिकेशन्स मिळणार आहेत. याविषयी आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. ते जाणून घ्या….
नोकियाचा फीचर फोन Nokia 8210 4G 3 हाजर 999 रुपये किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन डार्क ब्लू आणि रेड शेड कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. Nokia 8210 4G नोकिया इंडियाच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करता येईल. कंपनी फोनसोबत एक वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटीही देत आहे.
या नोकिया फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसह 3.8-इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. फोनमध्ये 128 एमबी रॅमसह 48 एमबी स्टोरेज क्षमता आहे, जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 32 जीबीपर्यंत वाढवता येते. फोनमध्ये Unisoc T107 प्रोसेसर उपलब्ध आहे आणि फोन सीरीज 30+ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. नोकिया 8210 4G मध्ये 0.3-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देखील उपलब्ध आहे.
नोकिया 8210 4G मध्ये 1450mAh बॅटरी उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये एफएम रेडिओ, एमपी3 प्लेयर, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि मायक्रो यूएसबी पोर्ट आहे. यासोबतच फोनमध्ये स्नेक, टेट्रिस, ब्लॅकजॅक सारख्या गेमसह एलईडी टॉर्चही देण्यात आला आहे. फोनचे वजन 107 ग्रॅम आहे.