Nokia C12 : मोठ्या स्क्रिनसह नोकियाचा बजेट फोन लाँच, किंमत फक्त 5,999 रुपये
एचएमडी ग्लोबलनं भारतात Nokia X30 नावाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. या कंपनीने 6000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा फोन लाँच केला आहे. या फोनला नोकिया सी12 असं नाव दिलं आहे.
1 / 5
स्मार्टफोनमध्ये तीन रंगांचे ऑप्शन्स आहे. यात डार्क सियान, चारकोल आणि लाइट मिंट रंगांचा समावेश . हा एक बजेट फोन असून 6000 हजार रुपये कमी किंमत आहे. (फोटो: Nokia)
2 / 5
नोकिया सी 12 च्या बॅक साईडला सिंगल कॅमेरा आहे. बॅक पॅनल प्लास्टिकने बनवलेलं आहे. नोकिया सी 12 तिन्ही रंग एकदम भारी आहेत. स्मार्टफोन दोन वर्षांच्या रेग्युलर सेफ्टी अपडेटसह येतो. (फोटो: Nokia)
3 / 5
नोकिया सी 12 मध्ये 6.3 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच असून त्यात सेल्फी कॅमेरा आहे. नोकिया सी12 मध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल रियर कॅमेरा सिस्टम आहे. फोनमध्ये नाइट मॉडल आणि पोर्टेट मोड सारखे फीचर्स आहेत. (फोटो: Nokia)
4 / 5
फोनमध्ये अँड्रॉईड 12 वर चालतो. यात अॅडव्हान्स ऑक्टो कोर चिपसेट आहे. यात 2 जीबी एक्स्ट्रा वर्च्युअल रॅमसह येतो. युजर्संना आपल्या पसंतीच्या अॅपसह नेविगेट करण्यास मदत करेल. या फोनमध्ये लेटेस्ट परफॉर्मेंस ऑप्टिमायझर आहे.विना वापर करताही बॅकग्राउंडला असलेले अॅप क्लिन करतो. (फोटो: Nokia)
5 / 5
नोकिया सी12 भारतात ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात 2 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. यात 2 जीबी अॅडिशनल मेमरी एक्स्टेंशन आणि 256 जीबी एडीशनल मेमरी सपोर्ट करू शकतो. हा स्मार्टफोन 17 मार्चपासून 5999 रुपयांच्या लिमिटेड पिरियडसाठी लाँच किंमतीत मिळेल. (फोटो: Nokia)