Nokia ने आपला लोगो बदलला, 60 वर्षांनंतर घेतला निर्णय

| Updated on: Feb 27, 2023 | 4:20 PM

नोकीयाने आपला लोगो बदलायचे ठरवले आहे. कंपनीचा हा निर्णय तुम्हाला पटला आहे का ? की आधीचाच लोगो चांगला आहे...

Nokia ने आपला लोगो बदलला, 60 वर्षांनंतर घेतला निर्णय
nokia
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल कंपनी NOKIA ने आपला आयकॉनिक लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आपला लोगो तब्बल साठ वर्षांनंतर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. साल 1966 नंतर नोकीया कंपनीने आपल्या लोगोमध्ये थोडेफार बदल केले असले तरी संपूर्णपणे आताच बदल होत आहे. याबरोबरच कंपनी आता मोबाईल फोनच्या निर्मिती शिवाय नेटवर्क व्यवसाय क्षेत्रात पुन्हा उतरत आहे. स्पेनच्या बार्सिलोना मध्ये सध्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस परिषद भरली आहे. याच मुहूर्तावर नोकीयाने आपल्या लोगो बदलाची घोषणा केली आहे.

कोणत्याही कंपनीचा लोगो ही तिची ग्राहकांच्या मनात रूजलेली तिची ओळखच असते. कंपन्या फार लवकर किंवा सहजा सहजी आपल्या ब्रॅंड नेम आणि लोगोत बदल करीत नाहीत. आता नोकीयाने आपल्या लोगोला पाच आकारासह तयार केले आहे. हे पाच आकार मिळून नोकीया हे इंग्रजी नाव दिसते. नोकीयाचा लोगोचा रंग नेहमी निळ्या रंगाचा असायचा. आता तर हा रंगही बदलणार आहे.

दोन लोगो तुम्हाला पहायला मिळणार ?

नोकीया कंपनी केवळ मोबाईलची निर्मितीच करीत नसून ती इक्विपमेंट्स ही तयार करीत असते. त्यामुळे नोकीयाचे त्यामुळे आता नोकीयाचे दोन लोगो तुम्हाला पहायला मिळणार आहेत. एक लोगो मोबाईल उत्पादनांसाठी असणार आहे. तर दुसरा लोगो त्यांच्या अन्य बिजनेससाठी वापरला जाणार आहे.

जरी नोकीयाने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला असला तरी कंपनीचे फोन बनविण्याचे लायसन्स फिनलंडची कंपनी एचएमडी ग्लोबल हीच्या कडे आहेत. परंतू सूत्रांनी दिलेल्या बातमीनूसार एचएमडी ग्लोबलने म्हटले आहे ती नोकीया जुन्या लोगोसह आपले स्मार्टफोन प्रोडक्ट विकणार आहे.

केवळ स्मार्टफोन विक्री करणारी कंपनी नाही

नोकीया आता केवळ स्मार्टफोन विक्री करणारी कंपनी राहीलेली नाही. आता ही बिजनेस टेक्नॉलॉजी कंपनी बनली आहे, असे कंपनीच्या सीईओंनी म्हटले आहे. स्पेनच्या बार्सिलोना मध्ये सध्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस परिषद भरली आहे. याच मुहूर्तावर नोकीयाने आपल्या लोगो बदलाची घोषणा केली आहे.

नोकीया कंपनी तिच्या गुणवत्तेसाठी एक यशस्वी मोबाईल ब्रांड म्हणून बहुतांशी लोकांना माहिती आहे, परंतू नोकीया म्हणजे केवळ मोबाईल फोन्स नाहीत. कंपनीला आता आपल्या अन्य व्यवसाय असलेल्या नेटवर्क बिझनेसमधील रूपानेही ओळखले जावे अशी कंपनीची इच्छा असल्याचे कंपनीच्या सीईओंनी ब्लॉगपोस्टमध्ये लिहीले आहे.

2024 नंतरच पाहायला मिळणार

नोकीया एक असा ब्रांड आणू इच्छीत आहे जो नेटवर्क आणि डिजीटल व्यवसायाकडे लोकांचे लक्ष वेधू शकेल असे कंपनीने म्हटले आहे.
नोकीयाने लोगो बदल करण्याची घोषणा केली तरी हा लोगो प्रत्यक्षात ग्राहकांना प्रत्यक्षात 2024 च्या आधी पाहायला मिळणार नाही. कारण सध्याची उत्पादने तिच्या जुन्या लोगोसह विकली जाणार आहेत. आता नोकीया फोन्स बनविणारी एचएमडी ग्लोबल कंपनी नव्या लोगोसह उत्पादन बाजारात आणणार का याची उत्सुकता त्यामुळे कायम राहणार आहे.