नवी दिल्ली : नोकिया या नामांकित फोनच्या फॅन फेस्टिवल सेल सध्या सुरु आहे. या सेलमध्ये Nokia 8.1, Nokia 7.1, Nokia 6.1 Plus आणि Nokia 8 Sirocco या चार स्मार्टफोनवर तब्बल 6 हजारांचा डिस्काऊंट दिला आहे. नुकतंच कंपनीने Nokia 6.1 Plus आणि Nokia 5.1 Plus या दोन फोनची किंमत कमी केली होती. त्यानंतर आता नोकियाद्वारे या चार फोनवर 6 हजारांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे. नोकियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे.
नोकिया इंडियाच्या वेबसाईटवरील फोन फॅन फेस्टिवलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Nokia 8.1 या स्मार्टफोनच्या 4 GB व्हेरियंटवर 6 हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे. यासाठी FAN6000 या प्रोमोकोडचा ग्राहकांना वापर करावा लागणार आहे. त्यासोबतच Nokia 8.1 या 6 GB रॅमच्या स्मार्टफोनवर 4 हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांना FAN4000 या प्रोमोकोडचा वापर करावा लागणार आहे.
त्याशिवाय नोकियाच्या या फोन फेस्टिवलमध्ये Nokia 7.1, Nokia 6.1 Plus आणि Nokia 8 Sirocco या फोनवर 1000 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे.
Ready. Set. Save! The Nokia mobile Fan festival is here again. Get up to Rs.6000 off on select Nokia smartphones. Explore our range at https://t.co/Ly2SxbVXvx pic.twitter.com/VMMaa0pAwy
— Nokia Mobile India (@NokiamobileIN) May 20, 2019
मे महिन्याच्या सुरुवातीला नोकिया फोन फॅन फेस्टिवलची सुरुवात केली होती. हा सेल 24 मे रोजी संपणार आहे. नुकतंच नोकियाद्वारे Nokia 6.1 Plus आणि Nokia 5.1 Plus या दोन फोनची किंमत काही काळासाठी कमी केली होती. Nokia 6.1 Plus या स्मार्टफोनच्या 4GB रॅमच्या स्मार्टफोनवर 1 हजार 750 रुपयांचा प्रमोशनल डिस्काऊंट दिला होता. तसेच Nokia 5.1 Plus च्या 3GB रॅमच्या स्मार्टफोनवरही 1 हजार 750 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे.
दरम्यान गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात Nokia 8.1 या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB आणि 6GB + 128GB हे दोन व्हेरियंट लाँच केली होते. या फोनची किंमत अनुक्रमे 26 हजार 999 आणि 29 हजार 999 इतकी आहे.