VIDEO : आता सुटकेस उचलू नका, तीच तुमच्यासोबत चालेल!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात सध्या अनेक नवनव्या गोष्टी घडत आहेत. आपल्या दररोजच्या वापरातील वस्तूंमध्येही आता नव्या तंत्रज्ञानानुसार बदल होत आहेत. असेच एक भन्नाट संशोधन सुटकेसवर करण्यात आले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने रोबोट सुटकेस तयार करण्यात आली आहे. चीनच्या बीजिंगमधील एका स्टार्टअपने ही किमया साधली आहे. या फॉरवर्ड एक्स असे या स्टार्टअपचं नाव आहे. या अफलातून […]

VIDEO : आता सुटकेस उचलू नका, तीच तुमच्यासोबत चालेल!
Follow us on

मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात सध्या अनेक नवनव्या गोष्टी घडत आहेत. आपल्या दररोजच्या वापरातील वस्तूंमध्येही आता नव्या तंत्रज्ञानानुसार बदल होत आहेत. असेच एक भन्नाट संशोधन सुटकेसवर करण्यात आले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने रोबोट सुटकेस तयार करण्यात आली आहे. चीनच्या बीजिंगमधील एका स्टार्टअपने ही किमया साधली आहे. या फॉरवर्ड एक्स असे या स्टार्टअपचं नाव आहे. या अफलातून रोबोट सुटकेसला Ovis असे नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, ही सुटकेस तयार करण्यासाठी इतरांकडून पैसे जमा करत ही सुटकेस तयार केली आहे.

नेहमीच्या वापरातील सुटकेसप्रमाणेच ही सुटकेस आहे. याही सुटकेसला चार चाकं आहेत. दोन यूएसबी पोर्ट या सुटकेसला असून, सुटकेसच्या मदतीने तुमचा स्मार्टफोनही चार्ज करु शकता.

पाहा व्हिडीओ :

 

काय आहे या सुटकेसची खासियत?

या सुटकेसमध्ये 170 डिग्री वाईड अॅँगल कॅमेरा लेंस आहे. तुम्ही याला Ovis चे डोळे समजू शकता. या डोळ्यांच्या माध्यमातून Ovis चेहरा ओळखू शकतो, शरिराची हालचाल ट्रॅक करु शकतो. या वैशिष्ट्यांमुळे Ovis कुणाला न ठोकता आपल्या मालकासोबत चालू शकतो. जर तुम्हाला या सुटकेसपासून वेगळे करायचे असेल, तर या सुटकेसची बॅटरी काढून त्याला इनअॅक्टिव्ह करावं लागेल. सुटकेस इनअॅक्टिव्ह केल्यावर तुम्हाला मेसेज येईल. जर सुटकेस चोरीला गेली, तर चिंता करायचे काही कारण नाही. यामध्ये जीपीएस सिस्टम बसवण्यात आली आहे. त्यामुळे तुमची सुटकेस कुठे आहे, याची माहिती मिळू शकते.

Ovis मध्ये लावण्यात आलेल्या सेंसरमुळे ही सुटकेस कुणालाही ठोकर मारु शकत नाही. समोर जर कुणी असेल, तर आपला रस्ता ही सुटकेस बदलते. सध्या या प्रॉडक्टवर ट्रायल सुरु आहे आणि थोडे बदल केल्यानंतर काही दिवसांनी ही सुटकेस बाजारात उपलब्ध होणार आहे. ही सुटकेस पहिले आपल्या मालकाच्या मागे मागे चालत होती. मात्र लोकांच्या प्रतिसादानंतर आता यामध्ये बदल करुन ही सुटकेस मालकासोबत बाजूला चालणार आहे.

किंमत किती?

Ovis पहिली सेल्फ ड्रायव्हिंग सुटकेस नाही. या आधी ट्रॅव्हलमेट कंपनीने अशा प्रकारची सुटकेस लाँच केली आहे. मात्र ट्रॅव्हलमेटच्या सुटकेसची किंमत 1100 डॉलर आहे. तर Ovisची किंमत फक्त 700 डॉलर आहे.