आता अँड्रॉईड अॅप तुमच्या कंप्युटरवर, मायक्रोसॉफ्टचं नवं अपडेट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : मायक्रोसॉफ्टने टेस्टिंग करण्यासाठी एक अपडेट जारी केलं आहे. हे अपडेट तुमच्या खूप कामी येऊ शकतं. मायक्रोसॉफ्ट Windows 10 ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अँड्रॉईड अॅप्लिकेशन सुरु करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने Windows इंसाइडर्ससाठी ‘Phone Screen’ फिचरची सुरुवात केली आहे. या ‘Phone Screen’ फिचरसाठी युझरकडे Windows 10 चं लेटेस्ट व्हर्जन आणि फोन अॅप्लिकेशन असणे आवश्यक आहे. फोनची […]

आता अँड्रॉईड अॅप तुमच्या कंप्युटरवर, मायक्रोसॉफ्टचं नवं अपडेट
Follow us on

मुंबई : मायक्रोसॉफ्टने टेस्टिंग करण्यासाठी एक अपडेट जारी केलं आहे. हे अपडेट तुमच्या खूप कामी येऊ शकतं. मायक्रोसॉफ्ट Windows 10 ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अँड्रॉईड अॅप्लिकेशन सुरु करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने Windows इंसाइडर्ससाठी ‘Phone Screen’ फिचरची सुरुवात केली आहे.

या ‘Phone Screen’ फिचरसाठी युझरकडे Windows 10 चं लेटेस्ट व्हर्जन आणि फोन अॅप्लिकेशन असणे आवश्यक आहे. फोनची स्क्रिन थेट Windows 10 मध्ये मिरर केली जाते. यानंतर ते अॅप तुमच्या कंप्युटरवर सुरु होतं. येथे अनेक अँड्रॉईड अॅप्लिकेशन मिळतात ज्यापैकी कुठलंही एक आपल्याला निवडावं लागतं. ते अॅप तुमच्या कंप्युटरमध्ये एक्सेस होईल.

रिमोट सेशनच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमधील अॅप कंप्युटरमध्ये मिरर केले जातील. सध्या या फिचरची चाचणी सुरु आहे. हे फिचर प्रत्येक कंप्युटरमध्ये काम करणार नाही. तसेच प्रत्येक स्मार्टफोनलाही ते सपोर्ट करणार नाही. चाचणी दरम्यान हे फिचर Galaxy S8, S8 Plus, S9 आणि S9 Plus मध्ये स्क्रिन मिररिंगचं फिचर मिळेल.

हे फिचर सामान्य युझर्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.