नवी दिल्ली | 25 सप्टेंबर 2023 : मोबाईलच्या टेक्नॉलॉजीत सातत्याने नवनवीन बदल होत आहेत. स्मार्टफोनच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत नवनवीन क्रांती होत आहे. एकेकाळी मोबाईल मधून बॅटरी वेगळी काढून त्याला चार्ज करण्याची पद्धत होती. आता तर वायरलेस चार्जरची देखील सोय झाली आहे. मात्र आता त्याउपरही नवीन तंत्रज्ञान लवकरच येत आहे. या टेक्नॉलॉजीत मोबाईल फोनला चार्जर शिवायच चार्ज करता येणार आहे. या तंत्राचे नाव Qi2 असे नाव देण्यात आले आहे. चला आपण Qi2 तंत्रज्ञान काय आहे ते पाहूयात…
Qi वायरलेस चार्जिंग हे काही नवीन तंत्रज्ञान नाही. परंतू Qi2 जरुर नवीन तंत्रज्ञान आहे. वायरलेस चार्जिंगला Qi चार्जिंग म्हटले जाते. ज्या फोन किंवा डीव्हाईसला वायरलेस चार्जिंग सुविधा असते त्यावर Qi लिहीलेले असते. Qi2 वायरलेस चार्जिंगचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. Qi2 देखील एका प्रकारची वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. ज्याची चर्चा iPhone 15 सिरीज लॉंच झाल्यानंतर सुरु झाली आहे. एप्पलन आयफोन 15 सिरीजमध्ये Qi2 सपोर्ट दिला आहे. Qi2 ला Qi 2.0 देखील म्हणू शकता. Qi मध्ये फोनला एका चार्जिंग पॅडवर ठेवून चार्ज करावे लागते. तर Qi2 मध्ये फोनला पॅडवर ठेवायची गरज नाही.Qi2 ही शंभर टक्के वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. Qi2 तंत्रात एडव्हान्स इलेक्ट्रोमॅग्नेटीक रेजोनेंस तरंगाच्या मदतीने हवेतल्या हवेत फोनला चार्ज करता येते.
Qi2 तंत्र इलेक्ट्रॉमॅग्नेटीक रेजोनेंसवर आधारित आहे. या तंत्रात चार्जर आणि डीव्हाईसला जोडला जात नाही. यात ट्रान्समीटर आणि रिसिव्हर दोन्ही क्वॉईलचा वापर होतो. जेव्हा स्मार्टफोन ट्रान्समीटर आणि रिसीव्हर दोन्ही क्वाईलच्या रेंज मध्ये येतो तेव्हा या क्वॉईल इलेक्ट्रोमॅग्नेटीक फिल्ड तयार करतात.ज्यामुळे फोन चार्ज होऊ लागतो. वायरलेस चार्जिंगपेक्षा यात चार्जिंगचा वेग जास्त असतो. वापरायला सोपे आहे. यात चार्जर आणि केबलची गरज नाही. परंतू Qi2 चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशनची गरज लागते. Qi2 चा एक परिघ असेल तेथे आल्यावरच फोन चार्ज होतील. Qi2 याचा उपयोग सार्वजनिक जागा, घर आणि कार्यालयात मोठ्या प्रमाणात होईल. शिवाय पर्यावरणात ई कचरा कमी होईल. चार्जर , केबल, एडॅप्टरची गरज संपेल.