लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळीला रंग चढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा खास शो सध्या देशभरात चर्चेत आहे. पंतप्रधानांनी ई-स्पोर्ट्स इंडस्ट्रीजमधील नामचिन खेळाडूंशी हितगुज साधले. इतकेच नाही तर त्यांनी अनेक Games खेळून पण पाहिले. Gaming Industry मधील क्रिएटर्सशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी टॉप प्लेयर्स ig_Mortal, अनिमेश अग्रवाल उर्फ 8bit Thug, मिथिलेश पाटणकर उर्फ Mythpat, पायल धारे उर्फ Payal Gaming, अंशू बिष्ट उर्फ Gamerfleet, तीर्थ मेहता आणि गणेश गंगाधर या खेळाडूंशी दिलखुलास संवाद साधला. गेमिंग इंडस्ट्रीतील बारकावे समजून घेतले. आता त्यांचा निशाणा कोणावर आहे आणि ते कोणाचा गेम करणार, हे वेगळं सांगायला हवं का?
युट्यूबवर ट्रेलर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुआयामी म्हणून ओळखले जातात. ते सहज कोणाशी संवाद साधू शकतात. गेमिंग इंडस्ट्रीतील सध्याच्या दिग्गज खेळाडूंशी त्यांनी चर्चा केली. याविषयीचा व्हिडिओ शूट करण्यात आला. त्याचा एपिसोड लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या YouTube चॅनलवर रिलीज होईल. त्यापूर्वी त्याचा ट्रेलर दाखविण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान या तरुणांशी चर्चा करताना, ई-स्पोर्ट्सविषयीचे बारकावे समजून घेताना दिसून येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर या गेमर्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयीची माहिती शेअर केली. त्यांनी या भेटीबद्दल त्यांच्या समाज माध्यमावर सविस्तर वृ्त्तांत कथन केला आहे. त्यानुसार, या खेळाडूंना या गेमिंगबद्दल पंतप्रधान माहिती घेताना दिसत आहेत. गेमिंग आणि गॅम्बलिंगमधील अंतर काय, गेमर्सला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, याविषयीची विचारणा करण्यात आल्याचे दिसते.
Game on ft. NaMo 🎮
Coming soon!
📽️ https://t.co/vXydGAPdOG pic.twitter.com/cE3vEew90k
— narendramodi_in (@narendramodi_in) April 11, 2024
13 एप्रिल रोजी एपिसोड रिलीज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गेमिंग इंडस्ट्रीजमधील या दिग्गजांमधील ही चर्चा येत्या 13 एप्रिल रोजी रिलीज होईल. अग्रवाल आणि पाटणकर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. ई-स्पोर्ट्स इंडस्ट्रीविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. त्यांच्या कल्पना या गेमिंग उद्योगाला पूर्णपणे बदलवून टाकतील, असा विश्वास या गेमर्संना वाटत आहे.