OnePlus 8 Pro आता ‘वायरशिवाय’ चार्ज होणार

| Updated on: Jan 23, 2020 | 4:21 PM

स्मार्टफोन कंपनी आजकाल नवनवीन टेक्नॉलॉजीवाले फोन लाँच (One plus 8 pro new smartphone) करत आहे. यामध्ये एक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.

OnePlus 8 Pro आता वायरशिवाय चार्ज होणार
Follow us on

मुंबई : स्मार्टफोन कंपनी आजकाल नवनवीन टेक्नॉलॉजीवाले फोन लाँच (One plus 8 pro new smartphone) करत आहे. यामध्ये एक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. शाओमी आणि ओप्पोनंतर आता वनप्लसही आपल्या येणाऱ्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 8 Pro मध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट (One plus 8 pro new smartphone) देत आहे.

नुकतेच एका लीक्स्टरने ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये वनप्लसचा नवा फोन वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह दिसत आहे. फोन एका चार्जिंग पॅडवर ठेवलेला आहे. तसेच या ट्वीटमध्ये ‘charge like a pro’ असं कॅप्शन दिलं आहे. पण हा फोटो असली वनप्लस 8 प्रोची नसल्याने बोललं जात आहे. वनप्लस काही वर्षांपासून या चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करत आहे.

स्पेसिफिकेशन

वनप्लस 8 प्रोच्या स्पेसिफिकेशन्समध्ये 6.65 इंचाचा फ्लूइड डिस्प्ले, CAD रेंडर्सनुसार पंच होल आणि कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आळा आहे. सेल्फी कॅमेरासाठी दिलेला पंच होल डिस्प्लेमध्ये वरती लेफ्ट साईडला आहे. फोनचा डिस्प्ले क्वॉड एचडी+ आणि 120Hz रिफ्रेश रेटवाला असू शकतो. ही सर्व माहिती अधिकृत नाही.

या फोनमध्ये 12जीबीपर्यंत रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे. प्रोसेसरमध्ये स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट असू शकते.
फोटोग्राफीसाठी वनप्लस 8 प्रोला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मोगापिक्सलचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. फोनची बॅटरी 4500mAh असू शकते.