नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : ॲप्पलच्या आयफोन 15 ची (Apple iPhone 15) प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. आयफोन 15 आणि आयफोन 15 प्रोसाठी शुक्रवारपासून प्री-बुकिंग सुरु आहे. ॲप्पलचा हा स्मार्टफोन भारतात ब्लॉकबस्टर ठरु शकतो. गेल्या वर्षीपेक्षा प्री-बुकिंगमध्ये मोठी उसळी आली आहे. भारतीयांच्या या फोनवर उड्या पडल्या आहेत. जागतिक बाजार पेठेसह भारतात पण कंपनीने ह स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला आहे. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max या चार मॉडेल्ससाठी प्री-बुकिंग सुरु झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता प्री-बुकिंगला सुरुवात झाली. ॲप्पलचा नवीन दमदार आयफोन 22 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होईल.
काय आहे किंमत
ॲप्पलच्या iPhone 15 या बेसिक मॉडलला सर्वाधिक मागणी आहे. तर iPhone 15 Pro Max हा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. देशात आयफोन 15 ची किंमत जवळपास 79,900 रुपयांनी सुरु होत आहे. तर iPhone 15 Pro Max ची किंमत 1,59,900 ते 1,99,900 रुपयांदरम्यान असेल. एका रिपोर्टनुसार, ॲप्पलकडे आयफोन 15 चे 270,000-300,000 चा स्टॉक आहे. गेल्यावर्षी बाजारात आलेल्या iPhone 14 मालिकेपेक्षा हा साठा दुप्पट आहे. काही किरकोळ विक्रेत्यानुसार, ॲप्पलच्या iPhone 15 ची बाजारात क्रेझ आहे. चाहत्यांनी दोन दिवसांपूर्वीच त्याविषयीची विचारणा सुरु केली होती. बुकिंग सुरु होताच, त्यावर ग्राहकांच्या उड्या पडल्या. खरेदीसाठी एकच झुंबड उडाली.
अजून किती प्रतिक्षा
तुम्ही आयफोन 15 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रतिक्षा करावी लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात Apple ची मालकी असलेले ऑनलाईन स्टोअरवर iPhone 15 Pro Max चा प्रतिक्षा कालावधी एक महिन्यांहून अधिक झाला आहे. जागतिक बाजारातील अनेक बाजारात या मॉडेलची कमतरता आहे. तर iPhone 15, 15Plus आणि15 Pro सारखे इतर स्मार्टफोन मॉडल ऑनलाईन खरेदीसाठी आणि डिलिव्हरीसाठीचा कालावधी वाढला आहे. 22 सप्टेंबर रोजी दिल्ली आणि मुंबईतील Apple स्टोअरमध्ये हे मॉडल उपलब्ध आहेत. 22 सप्टेंबर रोजी कंपनी भारतासह जवळपास 40 देशांमध्ये iPhone 15 एकाचवेळी लाँच करेल.
बेसिक व्हेरिएंटची नाही कमतरता
Apple आणि त्याच्या प्रमुख आणि किरकोळ विक्रेत्यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार iPhone 15 च्या बेसिक व्हेरिएंटची कमतरता नाही. कारण हा स्मार्टफोन भारतात तयार होत आहे. गेल्या वर्षी मात्र भारतात स्मार्टफोन उपलब्ध होण्यात काही अडचणी आल्या होत्या.
ॲप्पलच्या नव्या दमाच्या आयफोनशी इस्त्रो कनेक्शन समोर आले आहे. iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये इस्त्रोचे GPS बसविण्यात आले आहे. हे मॉडेल इंडियन सॅटेलाईट नेव्हिगेशन सिस्टमचा वापर करणार आहे. पहिल्यांदाच आयफोन युझर्स परदेशी नाही तर भारतीय जीपीएस सिस्टमचा वापर करतील. त्यामुळे भारतीय युझर्सला प्रवासा दरम्यान, नकाशा पाहण्यासाठी या नॅव्हिगेशनचा वापर करता येईल.