OnePlus 10 Pro price and sale date : वनप्लस (OnePlus) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने भारतात आपली नवीन सिरीज भारतात लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. या सिरीजचे नाव वनप्लस 10 सिरीज (OnePlus 10 Series) असे असेल. या सीरीजअंतर्गत OnePlus 10 Pro हा स्मार्टफोन देखील लॉन्च केला जाईल, ज्याची किंमत लॉन्च होण्यापूर्वीच समोर आली आहे. हा स्मार्टफोन 31 मार्चला भारतात लाँच केला जाईल. टिपस्टर अभिषेक यादवने या फोनच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी या स्मार्टफोनच्या पहिल्या सेलचा खुलासाही केला आहे. लीक्स रिपोर्ट्सनुसार, या स्मार्टफोनची किंमत 70 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. लॉन्च होण्यापूर्वी हा फोन अमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स साईटवर लिस्टही झाला आहे.
OnePlus 10 Pro चं बेस व्हेरिएंट 66,999 रुपयांच्या किंमतीसह भारतात दाखल होऊ शकतं. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 71,999 रुपये इतकी असेल. जर तुम्ही या फोनची OnePlus 9 Pro शी तुलना केली तर 9 Pro ची सुरुवातीची किंमत 64999 रुपये इतकी असेल.
OnePlus 10 Pro मध्ये 6.7-इंचांचं LTPO 2.0 AMOLED पॅनल देण्यात आलं आहे. यात 2K (2 हजार रिझोल्यूशन) आहे आणि त्याचा रिफ्रेश रेट 120hz इतका आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्ट्सचा वापर करण्यात आला आहे. याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 92.7 टक्के आहे.
OnePlus 10 Pro मध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा प्रोसेसर 12 GB LPDDR5 रॅम आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो.
OnePlus 10 Pro च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर याच्या बॅक पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे, जो Sony IMX 789 चा सेन्सर आहे. तर सेकेंडरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे, तर तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरचाही समावेश करण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपसाठी, 5000 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी 80W सुपर वूक फास्ट चार्जिंगसह येते. यात 50W वायरलेस चार्जिंग सिस्टम देखील मिळेल.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स