मुंबई : टेक दिग्गज वनप्लसने (OnePlus) सोमवारी फ्लिपकार्टबरोबर भागीदारी करत बजेट अनुकूल स्मार्ट टीव्ही पोर्टफोलिओ (Smart Tv Portfolio) सादर केला आहे. या स्मार्ट टीव्हीसह कंपनीने आपली फ्लिपकार्टसोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, वनप्लस टीव्ही वाय सीरिज (OnePlus TV 40Y1) हा एक 40 इंचांचा टीव्ही असून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 21,999 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध असेल. (OnePlus launches new smart TV OnePlus TV 40Y1 in India at 21999 Rs)
त्याशिवाय फ्लिपकार्टने या टीव्हीवर त्वरित सवलत दिली आहे. एचडीएफसी बँक कार्ड वापरुन हा टीव्ही खरेदी करताना ग्राहकांना 10 टक्के सूट मिळू शकेल. नवीन OnePlus TV 40Y1 यापूर्वी लाँच केलेल्या 32 इंच आणि 43 इंचाच्या मॉडेल्समध्ये फिट आहे. OnePlus TV 32Y1 हा स्मार्ट टीव्ही 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर OnePlus TV 43Y1 हा स्मार्ट टीव्ही 26,999 रुपयांमध्ये येतो. ही इंट्रोडक्टरी प्राईस ऑफर 31 मे पर्यंत उपलब्ध असेल.
हा टीव्ही 64 बिट प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे आणि Android TV 9-बेस्ड ऑक्सिजनप्लेवर चालतो. 40 इंचांची स्क्रीन असलेला हा टीव्ही फुल एचडी डिस्प्ले रेझोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे आणि त्यात 93 टक्के DCI-P3 गमेट कव्हरेज आहे आणि गॅमा इंजिन पिक्चर एन्हेंसर देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये बिल्ट-इन क्रोमकास्टसह अलेक्सा आणि गुगल असिस्टंटची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे.
OnePlus TV40Y1 स्मार्ट टीव्हीमध्ये दोन 20W स्पीकर्स आहेत जे डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह येतात. या स्मार्ट टीव्हीमध्ये इथरनेट पोर्ट, आरएफ कनेक्शन इनपुट, दोन एचडीएमआय पोर्ट, एक एव्ही इन, एक डिजिटल ऑडिओ आउटपुट आणि दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. हा टीव्ही वनप्लस ऑफलाइन स्टोअरमध्ये आणि OnePlus.in आणि Flipkart.com वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
OnePlus च्या Y सिरीजमधील अँड्रॉइड टीव्ही हे परवडणाऱ्या श्रेणीतील टीव्ही म्हणून ओळखले जातात. कंपनी सध्या या सिरीजमध्ये दोन टीव्ही विकत आहे. या दोन्ही टीव्हींची नावं OnePlus TV 32Y1 आणि OnePlus TV 43Y1 अशी आहेत, ज्यांच्या किंमती अनुक्रमे 15,999 आणि 26,999 रुपये इतक्या आहेत.
इतर बातम्या
LCD आणि LED टीव्हीमध्ये फरक काय? कोणता टीव्ही खरेदी करायला हवा?
15 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, जाणून घ्या टॉप 5 स्मार्टफोन्सचे फीचर्स
(OnePlus launches new smart TV OnePlus TV 40Y1 in India at 21999 Rs)