मुंबई – वनप्लस आपली Nord Series चे स्मार्टफोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 4 एप्रिल 2023 रोजी OnePlus Nord CE 3 Lite भारतात लाँच करणार आहे. असं असलं तरी मागच्या काही दिवसांपासून वनप्लसच्या Nord CE 3 Lite स्मार्टफोनची माहिती लीक आणि रिपोर्टनुसार समोर आली आहे. आता कंपनीने लाँचिंगपूर्वी काही फीचर्सवर शिक्कामोर्तब केला आहे. आपल्या अधिकृत वेबसाईटवर कंपनीने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. सोशल मीडिया अकाउंटवर स्पेसिफिकेशन आणि डिझाईनची माहिती देणारं टीझर रिलीज केलं आहे. चला जाणून घेऊयात या स्मार्टफोनमध्ये नेमकं काय काय आहे.
OnePlus Nord CE 2 Lite च्या अपग्रेडेड वर्जनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच केला आहे. यात प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा असणार आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमद्ये 3x lossless झूम फीचर असणार आहे.त्यामुळे चांगले डिटेल आणि क्लियर फोटो काढण्याची अनुभूती मिळणार आहे.
टेक रडारच्या एका मुलाखतीत वनप्लसचे अध्यक्ष आणि मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर किंडर लियूने सांगितलं की, वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. स्क्रिन 120 हर्ट्ज रिफ्रेस रेटसह येईल.
The more the merrier! #OnePlusNordCE3Lite 5G gives you up to 8GB of virtual RAM expansion for an even better mobile experience!
Know more: https://t.co/wOkNuQ8EIM pic.twitter.com/y4ePBN7ZUZ— OnePlus India (@OnePlus_IN) March 30, 2023
वनप्लसची अधिकृत वेबसाईटवर या स्मार्टफोनसाठी बनवलेल्या पेजवर याचे काही डिटेल्स देण्यात आले आहे. 67 सुपरवूक फास्ट चार्ज सपोर्टसह फोनमद्ये 500 एमएएच बॅटरी असणार आहे. इतकंच नाही तर फोनच्या डिझाईन आणि रंगाबाबतही माहिती देण्यात आली आहे.
एलईडी फ्लॅशसह बॅक पॅनेलवर कंपनीच्या ब्रँडिंग असणार आहे. हा स्मार्टफोन क्रोमॅटिक ग्रे आणि पेस्टल लाइम रंगात उपलब्ध असेल. डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर दिला आहे.
या फोनच्या किमतीबाबतही मध्यंतरी काही डिटेल्स लीक झाले होते. वनप्लस Nord CE 3 Lite ची किंमत भारतात 21 हजार 999 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. पण या किमतीत जीबी रॅम आणि स्टोरेजचा पर्याय मिळेल हे सांगण्यात आलेलं नाही. पण या किमतीत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.