नवी दिल्ली : वनप्लसने या वर्षाच्या सुरूवातीला आपल्या पहिल्या फिटनेस बँडचे अनावरण केले होते आणि आता 23 मार्च रोजी कंपनी त्यांचं पहिलं स्मार्टवॉच (Oneplus Watch) लॉन्च करणार आहे. वनप्लस असा दावा करीत आहे की त्यांचे हे फिटनेस वॉच ग्राहकांना सीमलेस कनेक्टिव्हिटी आणि बेस्ट इन-क्लास अनुभव प्रदान करेल. (OnePlus Watch awailable for pre orders before its launch)
या स्मार्टवॉचबाबत काही अहवाल प्रसिद्ध झाले आहेत, त्यावर विश्वास ठेवल्यास, वनप्लस वॉच चीनमधील ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म JD.com प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. स्मार्टवॉच बुक करण्यासाठी ग्राहकांना 600 रुपये द्यावे लागतात. जर ग्राहकांनी हे स्मार्टवॉच त्वरित प्री-बुक केले तर डिव्हाइस खरेदी दरम्यान त्यांना 1100 रुपयांची सूट मिळेल. दरम्यान, स्मार्टवॉचच्या लाँच इव्हेंटला काही तास बाकी असताना या डिव्हाईसबद्दलची काही माहिती लिक झाली आहे.
स्मार्टवॉच लाँच करण्यापूर्वी, वनप्लसने पुष्टी केली आहे की त्यांचे हे वॉच हार्ट रेट मॉनिटर करेल. कंपनीने पोस्ट केलेल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये असेही दर्शवले आहे की, हे डिव्हाईस वॉटरप्रूफ असेल. टीझरनुसार ते ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. कंपनी आश्वासन देत आहे की, डिव्हाइसमध्ये एक शानदार आणि लाईटवेट डिझाईन असेल. “एका टीझरमध्ये असे सुचवले आहे की स्मार्टवॉचमध्ये साईड बटण, रबर किंवा सिलिकॉन स्ट्रॅप आणि एक राऊंड डायल असेल.
वनप्लस वॉच गुगलच्या वेअर ओएससह येत नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. हे आरटीओएस-आधारीत ऑपरेटिंग सिस्टमवर चालते, जे युजर्सना चांगला परफॉर्मन्स आणि बॅटरी प्रदान करते. शुक्रवारी एका अहवालात वनप्लस वॉचची प्रमुख वैशिष्ट्ये लीक झाली आहेत. फिटनेस ट्रॅकर Sleep, Stress level,Blood Saturation, Heart rate monitor करण्यास सक्षम आहे. यामध्ये ऑटोमॅटिक वर्कआऊट डिटेक्शन फीचर आणि स्विमिंग मोडदेखील देण्यात आला आहे.
– वनप्लस वॉचमध्ये 4 जीबी स्टोरेज आणि 46 मिमी डायल असल्याचे म्हटले आहे. वनप्लस टीव्हीसाठी रिमोट म्हणून हे घड्याळ वापरता येईल.
– फास्ट चार्जिंग सपोर्टसह हे स्मार्टवॉच सादर करण्यात आलं आहे. 20 मिनिटांच्या चार्जिंगवर हे वॉच 7 दिवसांची बॅटरी प्रदान करते.
– हे सिल्व्हर आणि ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार आपण वनप्लस वॉच वरून फोन कॉल करू किंवा उत्तर देऊ शकता.
– हे डिव्हाईस आपल्या फोनवरील नोटिफिकेशन देखील दर्शवू शकतं आणि म्युझिक कंट्रोल करु शकतं. हे वॉच एलटीई व्हेरिएंटमध्ये सादर केलं जाईल.
वनप्लसच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, हे स्मार्टवॉच परवडणार्या किंमतीत सर्वोत्कृष्ट दर्जाचा अनुभव प्रदान करेल. कंपनी 10,000 रुपये किंमतीसह वनप्लस वॉच बाजारात आणण्याची शक्यता आहे. जर या सेगमंटमध्ये वेअरेबल्स लाँच केले गेले तर हे वॉच इव्हॉल्व, रियलमी वॉच एस प्रो आणि अमेझफिट या स्मार्टवॉचशी स्पर्धा करेल. कंपनीचा फिटनेस ट्रॅकर Amazon.in वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. वनप्लस वॉचची बहुदा वनप्लस इंडियाच्या अधिकृत साईटवरून विक्री केली जाईल.
इतर बातम्या
हजाराच्या चार्जरसाठी कोट्यवधींचा दंड, Apple ला ‘या’ देशाचा जोरका झटका
6GB-128GB, 48MP कॅमेरासह Micromax चा ब्लॉकबस्टर फोन लाँच, किंमत अवघी 9999
(OnePlus Watch awailable for pre orders before its launch)