Oneplus : वनप्लस 28 एप्रिल रोजी ‘मोअर पॉवर टू यू’ इव्हेंट (Launch event) होस्ट करणार असल्याची घोषणा ‘वनप्लस इंडिया’ने नुकतीच केली आहे. कंपनीने आपल्या इव्हेंटचे एक टीझर देखील रिलिज केले आहे. या टीझरनुसार, कंपनी आपल्या पुढील इव्हेंटमध्ये दोन नवीन प्रोडक्ट लाँच करण्याच्या तयारी आहे. यात, एक स्मार्टफोन आणि नॉर्ड TWS इअरबर्ड (Earbuds) असण्याचीदेखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, हा इव्हेंट 28 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता आयएसटी लाईव्ह स्टीम असणार आहे. दरम्यान, इव्हेंटबाबत अद्याप पूर्ण माहिती हाती आली नसली तरी, कंपनी आपल्या इव्हेंटमध्ये वनप्लस नोर्ड सीई 2 लाइट (Oneplus nord ce 2 lite) आणि ब्रांडेड इअरबड्स लाँच करू शकते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, कंपनीने, मोबाइल व बड्सबाबत अद्याप कुठलाही खुलासा केलेला नसला तरी हे प्रोडक्ट लाँच होण्याआधीच याबाबत विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत.
वनप्लस नोर्ड सीई 2 लाइटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच होल कटआउटसोबत 6.58 इंचीचा एचडी प्लस डिसप्ले दिला गेला आहे. सोबतच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटसोबत शिप होउ शकेल. त्यासोबत त्याला 6GB/8GB LPDDR4× रॅम आणि 128GB स्टोरेजसोबत जोडता येणार आहे.
हँडसेट अँड्रॉइड 11वर आधारित OxygenOS कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्सवर काम करेल. परंतु एका माहितीनुसार, अँड्रॉइड 12 वर आधारित OOS 12 बिल्ड टेस्टिंगमध्ये आहे. आणि लाँचपर्यंत ते तयार होउ शकते. हँडसेटमध्ये सिक्यूरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 5G नेटवर्क सपोर्ट असू शकतो. ‘हुड’च्या मते 33w च्या गतीने चार्जिंगला सपोर्ट करु शकेल अशा 5000mAh च्या बॅटरीचाही समावेश करण्यात आला आहे.
मोबाइलच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, वनप्लस नॉर्ड सीई 2 लाइटच्या मागे तीन कॅमेरे असतील. 64 एमपीचा प्रायमरी कॅमेरा, 2 एमपीचा मैक्रो सेंसर आणि 2 एमपीचे मोने लेंस असतील. सोबत सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी समोर 16 एमपीचा स्निपर असू शकतो.
वनप्लस 28 एप्रिलला आपला पहिला नॉर्ड ब्रांडेड TWS इअरबड्स लाँच करणार आहे. टीझर इमेजमध्ये दाखविण्यात आलेले इअरबड्सचे डिझाइन 91 मोबइल्स् हे शेअर केलेल्या रेंडरर्स आणि FCC सर्टीफिकेशन सोबत साधर्म्य असणारे आहेत. इअरबड्समध्ये स्टेम डिझाईन आणि इन इअर स्टाइल सिलिकॉन इअर टिप्स आहेत. इअरबड्समध्ये प्ले आणि पॉज, म्युझिक चेंज आणि दुसरे कंटोल देण्यात आलेले आहेत.