नवी दिल्ली, तुम्ही देशाबाहेर प्रवास करण्याचा विचार करत आहात का? पण पासपोर्ट नसल्यामुळे तुमची योजना खोळंबत असेल तर तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीत पासपोर्ट पडताळणीची सुविधा पूर्णपणे स्वयंचलित (Online Passport) होणार आहे. आता पासपोर्ट काढण्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. 15 दिवसांऐवजी आता 5 दिवसात पासपोर्ट मिळणार आहे. एवढ्या कमी वेळात पासपोर्ट बनवून तुम्ही देशाबाहेर कुठेही जाऊ शकता. मात्र, सध्या दिल्लीतच पासपोर्टची पडताळणी पूर्णपणे स्वयंचलित होणार आहे. पासपोर्ट कसा बनवता येईल ते आपण जाणून घेऊया.
जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. पासपोर्ट बनविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या स्टेप्सचे पालन करावे लागेल.
सप्टेंबर 2022 मध्ये लागू झालेल्या नवीन नियमानुसार, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नागरिक ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांद्वारे (POPSKs) हा अर्ज करू शकतात. तत्पूर्वी याबाबत निवेदन जरी करत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होत की, गेल्या काही महिन्यांपासून पासपोर्ट बनवण्यासाठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या (पीसीसी) मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रातून पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातच पोलिस मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया अनिवार्य आहे, कारण अर्जदाराच्या गुन्हेगारी नोंदी जर असतील तर, त्यांना पासपोर्ट मिळू देण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे.