डुअल कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह 9 हजारांच्या रेंजमध्ये OPPO चा नवीन स्मार्टफोन बाजारात

| Updated on: Mar 21, 2022 | 3:03 PM

चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने (Oppo) भारतात आपला नवीन स्मार्टफोन ओप्पो ए16ई (Oppo A16e) लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या मोबाईलमध्ये 4 GB रॅम असून याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

डुअल कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह 9 हजारांच्या रेंजमध्ये OPPO चा नवीन स्मार्टफोन बाजारात
Oppo A16e
Follow us on

मुंबई : चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने (Oppo) भारतात आपला नवीन स्मार्टफोन ओप्पो ए16ई (Oppo A16e) लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या मोबाईलमध्ये 4 GB रॅम असून याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. हा फोन अफोर्डेबल (परवडणाऱ्या) सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात रेडमी 10 प्राइम (Redmi 10 Prime) आणि रियलमीच्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. Oppo च्या या लेटेस्ट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.52 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये वॉटरड्रॉप नॉच असून त्यात सेल्फी कॅमेरा बसवण्यात आला आहे. या फोनचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. तसेच, कंपनीने यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण दिले आहे.

Oppo A16e च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.52-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो Teardrop Notch सह येतो. तसेच, यात HD+ रिझोल्यूशन आहे, जे 720 x 1600 पिक्सेल इतकं आहे. या फोनचा स्टँडर्ड रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कंपनीने यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो 89.27 टक्के इतका आहे.

Oppo A16e चा कॅमेरा सेटअप

OPPO A16e च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर स्क्वेअर शेपमध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल्सचा आहे. यात एलईडी फ्लॅश लाईट्स देखील आहेत. हा स्मार्टफोन Android 11 OS आधारित ColorOS 11.1 वर काम करतो.

Oppo A16e चा चिपसेट आणि रॅम

Oppo च्या या मोबाईल मध्ये Helio P11 चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन 3 GB RAM / 4 GB RAM अशा दोन व्हेरिएंटमध्ये लाँच होईल. तसेच यात 32 जीबी आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजचे दोन पर्याय आहेत. हा हँडसेट 4230 mAh बॅटरीसह येतो, ज्यामध्ये कंपनीने चार्जिंगसाठी मायक्रो USB पोर्ट दिला आहे.

Oppo A16e इतर स्पेक्स

या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेला नाही परंतु त्यात फेस अनलॉक फीचरचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये Dual 4D Vo LTE सपोर्ट देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास युजर्स या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड इन्सर्ट करु शकतात. यात 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे.

Oppo A16e ची किंमत

Oppo A16e च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर याच्या 3 GB RAM + 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये मिडनाईट ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर्सचा समावेश आहे.

इतर बातम्या

100 हून अधिक वॉच फेसेस, 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप, Truke Horizon Smartwatch बाजारात, किंमत…

Paytm Payments Bank भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला विकतेय? डेटा लीक्सच्या दाव्यांवर कंपनी म्हणते…

आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड, पाहा SMS द्वारे Aadhaar-Pan लिंक करण्याची सोपी पद्धत