भारतात लाँच झाला Oppo F19 स्मार्टफोन, Paytm वरुन खरेदी केल्यास मिळेल जबरदस्त डिस्काउंट

| Updated on: Apr 06, 2021 | 4:59 PM

या मोबाईलची पहिली विक्री 9 एप्रिलपासून सुरू होईल. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक कार्ड खरेदीवर तुम्हाला 7.5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. (Oppo F19 smartphone launched in India, you can get a huge discount if you buy from Paytm)

भारतात लाँच झाला Oppo F19 स्मार्टफोन, Paytm वरुन खरेदी केल्यास मिळेल जबरदस्त डिस्काउंट
भारतात लाँच झाला Oppo F19 स्मार्टफोन
Follow us on

नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने आज आपला नवीन स्मार्टफोन ओप्पो एफ 19 फोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि होल-पंच डिस्प्ले डिझाइनसह बाजारात आणला आहे. याशिवाय या फोनमध्ये 33 डब्ल्यूचा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला असून यात 128 जीबी स्टोरेज आणि अँड्रॉइड 11 चा सपोर्ट आहे. या फोनच्या लॉन्च ऑफरबद्दल बोलायचे तर तुम्ही 6 जीबी + 128 जीबी(6GB + 128GB) स्टोरेजसह ओप्पो एफ 19( Oppo F19) स्मार्टफोन केवळ 18,990 रुपयात खरेदी करू शकता. हा फोन मिडनाईट ब्लू आणि प्रिझम ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या मोबाईलची पहिली विक्री 9 एप्रिलपासून सुरू होईल. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक कार्ड खरेदीवर तुम्हाला 7.5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. (Oppo F19 smartphone launched in India, you can get a huge discount if you buy from Paytm)

पेटीएमवर फोन खरेदी केल्यास 11 टक्के कॅशबॅक

या व्यतिरिक्त जर तुम्ही पेटीएमकडून फोन खरेदी केली तर तुम्हाला 11 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय तुम्ही होम क्रेडिट, एचडीएफसी आणि कोटक बॅंकांकडून शून्य डाऊनपेमेंटवर ईएमआयद्वारे फोन खरेदी करू शकता. याशिवाय ओप्पो एफ 19(Oppo F19) फोन विकत घेणाऱ्या ग्राहकांना 1999 च्या ओप्पो एन्को डब्ल्यू 11 टीडब्ल्यूएस ईअरबड्स फक्त 1299 रुपयात मिळतील. याशिवाय 3,499 रुपयांच्या ओप्पो डब्ल्यू 31 वायरलेस हेडफोन्स ते केवळ 2,499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात.

ओप्पो एफ 19 चे वैशिष्ट्य

हा ड्युअल सिम स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड कलरओएस(ColorOS) 11.1 वर चालतो. यात 6.43 इंचाचा फुल एचडी + (1,080 × 2,400 पिक्सेल) एएमओएलईडी डिस्प्ले आहे आणि त्याचे आस्पेक्ट रेशियो 20 : 9 आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 एसओसी(octa-core Qualcomm Snapdragon 662 SoC) प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि 6 जीबी रॅमसह येतो. या फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येणार

ओप्पो एफ 19(Oppo F19) प्रो मध्ये 128 जीबीपर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढविले जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस / ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये आपणास इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल आणि पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आली आहे. (Oppo F19 smartphone launched in India, you can get a huge discount if you buy from Paytm)

इतर बातम्या

Kartik Aaryan | कोरोनामुक्त झालेल्या कार्तिक आर्यनने खरेदी केली Lamborghini, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

दोन तडफदार तरुण, ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो; वळसे पाटलांनी पदभार स्वीकारताच आठवणी ताज्या, जुना फोटो शेअर करत जयंत पाटील म्हणाले…