मुंबई : ओप्पो इंडियाने (Oppo India) आपला शानदार स्मार्टफोन ओप्पो के 10 (Oppo K10) भारतात लॉन्च केला आहे. K10 हा ओप्पोचा भारतात लाँच झालेला पहिला K-सिरीज स्मार्टफोन आहे, जो चीनमध्ये बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. लॉन्चच्या अगोदर, Oppo ने K10 चे काही टीझर सादर केले होते. हा फोन मोठा डिस्प्ले, 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा, एक्सपेंडेबल रॅम सपोर्ट आणि फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरीसह येतो. Oppo ने पुष्टी केली आहे की K10 हा 4G फोन आहे. OPPO K10 स्मार्टफोन भारतात 14,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. लिव्ह विदाऊट लिमिट्स (Live Without Limits) या टॅगलाइनसह हा फोन सादर करण्यात आला आहे.
OPPO K10 ची विक्री आजपासून (29 मार्च) सुरू होत आहे. दुपारी 12 वाजता या फोनचा सेल सुरु होईल. हा फोन ग्राहक Flipkart सह काही निवडक रिटेल आउटलेट्स आणि Oppo ऑनलाइन स्टोअरवरुन खरेदी करु शकतात. यासोबतच फोनच्या खरेदीवर काही उत्तम ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. तुम्ही SBI कार्डधारक असाल तर तुम्हाला फोनवर 2,000 रुपयांची सवलत मिळू शकते. फोनशी संबंधित उर्वरित ऑफर्स फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरून पाहता येतील. फोनवर 3 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI ची ऑफरदेखील दिली जात आहे.
फ्लिपकार्टवरुन हा फोन खरेदी करताना तुम्ही Bank Of Baroda चं Credit Card वापरुन पेमेंट केलंत तर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. एसबीआय क्रेडिट, क्रेडिट ईएमआय आणि डेबिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांसह हा फोन खरेदी करताना तुम्हाला 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळू शकतो.
We’re finally here with the all-rounder #OPPOK10, packed with incredible features for you to always #LiveWithoutLimits. The sale is live now on Flipkart!
Buy now: https://t.co/ZOgb6t6SbZ pic.twitter.com/vGUKChYmgn— OPPO India (@OPPOIndia) March 29, 2022
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स