5G सपोर्टसह Oppo K7x स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

| Updated on: Nov 04, 2020 | 3:14 PM

चिनी स्मार्टफोन कंपनी Oppo ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo K7x नुकताच लाँच केला आहे.

5G सपोर्टसह Oppo K7x स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us on

मुंबई : चिनी स्मार्टफोन कंपनी Oppo ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo K7x नुकताच लाँच केला आहे. कंपनीने या फोनबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केली आहे. तसेच चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo द्वारे फोन लाँच केल्याची घोषणादेखील केली आहे. (Oppo k7x launched with 5G support; know its price and specifications)

Oppo K7x ची किंमत

Oppo K7x हा कंपनीचा मिड-रेंज 5जी स्मार्टफोन आहे. लाँचिंगवेळी कंपनीने जाहीर केलं आहे की, या फोनची किंमत 1,399 चिनी युआन (जवळपास 15,600 रुपये) असेल. हा स्मार्टफोन ब्लू शॅडो आणि ब्लॅक मिरर या रंगांमध्ये लाँच केला आहे.

Oppo K7x चे स्पेसिफिकेशन्स

Oppo K7x मध्ये डुअल सिम सपोर्ट मिळेल. हा फोन Android 10 पर बेस्ड ColorOS 7.2 कस्टम स्किन वर चालतो. फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचांचा फुल HD+ आयपीएस LCD डिस्प्ले मिळेल. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 3 च प्रोटेक्शन आहे. Oppo K7x हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 720 चिपसेटसह लाँच केला आहे. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज (इंटर्नल मेमरी) स्पेस देण्यात आली आहे.

48 मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा

कॅमेराच्या बाबतीत हा फोन जबरदस्त आहे. यामध्ये तुम्हाला क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.7 लेन्ससह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, f/2.2 अल्ट्रा वाईड अँगल लेन्ससह 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर आणि f/2.4 लेन्ससह 2 मेगापिक्सलचे मायक्रो आणि पोर्ट्रेट सेन्सर देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी Oppo K7x मध्ये f/2.0 लेन्ससह 16-मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Amazon, Flipkart Sale : दिवाळीत खरेदी करा ‘हे’ पाच स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

(Oppo k7x launched with 5G support; know its price and specifications)