मुंबई : ओप्पो रेनो 7 प्रो (OPPO Reno 7 Pro), ओप्पो रेनो 7 (OPPO Reno 7) हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. ओप्पो (Oppo) चे हे मोबाईल कॅमेरा सेंट्रिक आहेत. यासोबतच यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व्हर्च्युअल रॅमचे फीचर्सही देण्यात आले आहेत, जे युजर्सना मल्टीटास्किंगसह फोनचा अधिक वापर करत असताना उपयुक्त ठरतील. उत्कृष्ट फोटोग्राफीसह या फोनमध्ये पबजी (PubG) सारख्या गेमचा आनंद घेता येईल. Oppo Reno 7 Series मध्ये AI कॅमेरा 64MP पर्यंत आणि उत्कृष्ट फास्ट चार्जिंगसह अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.
ओप्पो रेनो 7 सिरीजमधील लोअर व्हेरिएंट असून त्याची सुरुवातीची किंमत 28,999 रुपये आहे आणि या फोनची विक्री 17 फेब्रुवारीपासून सुरू होईल. Oppo Reno 7 Pro ची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे, ज्याची विक्री 8 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
Oppo च्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचांचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. जो 90hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचे रिझोल्यूशन 1080×2400 आहे. फोनमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे. फोनची खास गोष्ट म्हणजे कंपनीने यामध्ये 7 GB पर्यंत एक्सटेंडेड रॅम फीचर दिले आहे.
Oppo Reno 7 Pro च्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 8 मेगापिक्सल्सचा सेकेंडरी कॅमेरा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह सुसज्ज आहे. यात 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्सही देण्यात आली आहे. या लेन्सच्या मदतीने उत्तम फोटो क्लिक करता येतात. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या फोनमध्ये Sony IMX709 सेन्सर वापरला आहे.
The OPPO Reno7 Pro 5G is here to impress you. With the brilliance of the Flagship Portrait Camera System and a lot more, #ThePortraitExpert can be all yours. Pre-book your favorite for ₹39,999.#OPPOReno7Series
Pre-order now: https://t.co/dxK7nUeISC pic.twitter.com/howpoNmu5E— OPPO India (@OPPOIndia) February 4, 2022
Oppo Reno 7 मध्ये 6.43-इंचांचा डिस्प्ले आहे. यात स्नॅपड्रॅगन 778 जी प्रोसेसर आहे. यात 8 GB आणि 12 GB रॅमचा पर्याय दिला आहे. तसेच यामध्ये 128 GB आणि 256 GB स्टोरेजचे पर्याय उपलब्ध असतील. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा असून सोबत 2 मेगापिक्सल्सचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, या फोनला 4500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासाठी 60W चा चार्जिंग उपलब्ध आहे.
Watch the best of the #OPPOReno7Series launch event. #ThePortraitExpert is all set to wow you with its unmatchable camera technology starring the Sony IMX766 customised exclusively by OPPO and much more.
Pre-order OPPO Reno7 Pro 5G: https://t.co/H6N9atmqB7 pic.twitter.com/CGxl0TKWQQ— OPPO India (@OPPOIndia) February 4, 2022
इतर बातम्या
सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…
7700 mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, Motorola Moto Tab G70 बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात
Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?