मुंबई : आपण जर ब्रॉडबँड इंटरने स्पीडबद्दल बोलायचे म्हटले तर भारत मालदीव, बांगलादेश, पाकिस्तान आणि SAARC देशांमध्ये सर्वात जलद इंटरनेट स्पीड असलेला देश आहे. परंतु Ookla च्या रिपोर्टनुसार मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे आहे. (Pakistan, Sri Lanka and Nepal has more Mobile Internet Speed than India; Ookla Report)
जानेवारी 2021 बाबत जाहीर करण्यात आलेल्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सच्या अहवालानुसार, मोबाइल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे आहे. मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत भारतात सरासरी 12.41Mbps स्पीड मिळत आहे तर अपलोडिंग स्पीड केवळ 4.76Mbps इतकं आहे. या बाबतीत भारत जगात 131 व्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे, जर तुम्ही जागतिक सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीडचा विचार केला तर जगभरात सरासरी 46.74 एमबीपीएस डाऊनलोडिंग स्पीड मिळत आहे. तर अपलोडिंग स्पीड 12.49 एमबीपीएस इतकं आहे. यावरुन लक्षात येईल की, जगभरातील सरासरी इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारतात अनेक पटींनी मागे आहे. तर भारताच्या आसपास असेही काही देश आहेत, जे भारताहून गरीब आहे, मागास आहेत, परंतु या देशांमध्ये भारतापेक्षा जास्त मोबाईल इंटरनेट स्पीड उपलब्ध आहे.
Ookla स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सच्या रिपोर्टनुसार मालदीवमध्ये सरासरी 44.30Mbps इतकं मोबाईल इंटरनेट डाऊनलोडिंग स्पीड मिळतं. तर सरासरी 13.83Mbps इतक मोबाईल इंटरनेट अपलोडिंग स्पीड मिळतं.
Ookla स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत पाकिस्तानात सरासरी 17.95Mbps डाऊनलोड स्पीड आणि 11.16 Mbps इतकं अपलोड स्पीड मिळतंय. Ookla ने दावा केला आहे SAARC देशांमध्ये मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत पाकिस्तान मालदीवनंतर दुसऱ्या स्थानी आहे.
2020 च्या चौथ्या तिमाहीमधील मोबाईल इंटरनेट स्पीडचा विचार केला असता नेपाळमधील इंटरनेट स्पीड हे भारत आणि श्रीलंकेपेक्षाही अधिक आहे. Ookla स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सच्या रिपोर्टनुसार नेपाळमध्ये 18.44Mbps इतकं सरासरी डाऊनलोड स्पीड आणि 11.73 Mbps इतकं अपलोड स्पीड आहे.
Ookla ने त्यांच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, 2020 च्या चौथ्या तिमाहीत श्रीलंकेतील मोबाईल इंटरनेट स्पीड भारतापेक्षा जास्त होतं. Ookla च्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स रिपोर्टनुसार श्रीलंकेत 17.36 Mbps इतकं सरासरी डाऊनलोड स्पीड आहे, तर 8.40 Mbps इतकं अपलोड स्पीड आहे. भूतानदेखील याबाबतीत भारताच्या पुढे आहे. भूतानमध्ये 15 Mbps डाऊनलोड स्पीड आहे.
Ookla च्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स रिपोर्टनुसार भारतापेक्षा कमी मोबाईल इंटरनेट स्पीड बांगलादेश आणि अफगाणिस्तानात आहे. बांगलादेशमध्ये सरासरी 10.57 Mbps डाऊनलोड स्पीड आणि 7.19 Mbps अपलोड स्पीड मिळतं. अफगाणिस्तानात सरासरी 6.63 Mbps इंटरनेट डाऊनलोडिंग स्पीड मिळतं तर अपलोडिंग स्पीड 3.33 Mbps इतकं आहे. SAARC देशामध्ये मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या स्थानी आहे.
इतर बातम्या
मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro
Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट
Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार
(Pakistan, Sri Lanka and Nepal has more Mobile Internet Speed than India; Ookla Report)