Paytm चे मालक या रोबोट लॅपटॉपवर एकदम फिदा; तुम्ही बोलताच सुरु करतो की झटपट काम

| Updated on: Sep 08, 2024 | 4:17 PM

Robot Laptop : Paytm चे मालक विजय शेखर शर्मा यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात ते एका लॅपटॉप दाखवत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी याविषयीची पोस्ट केली आहे. Lenovo कॉन्स्पेप्ट लॅपटॉप त्यात दिसत आहेत. तुम्ही बोलताच हा लॅपटॉप काम सुरू करतो. यामध्ये अनेक खास फीचर आहेत.

Paytm चे मालक या रोबोट लॅपटॉपवर एकदम फिदा; तुम्ही बोलताच सुरु करतो की झटपट काम
विजय शेखर या लॅपटॉपच्या प्रेमात
Follow us on

Paytm चे मालक विजय शेखर शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन (आताचे X) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक रोबोट लॅपटॉप दाखवण्यात आला आहे. हा लॅपटॉप दिसायला एकदम आकर्षक आहे. हा लॅपटॉप व्हाईस कमांडवर (Voice Command) सुरू होतो आणि बंद होतो. हा लॅपटॉप बर्लिनमध्ये सुरु असलेल्या IFA 2024 दरम्यान सादर करण्यात आला. हा एक कॉन्सेप्ट लॅपटॉप आहे. त्यावर विजय शेखर एकदम फिदा झाले. कसा आहे हा लॅपटॉप, काय आहेत त्याच्यात खास फीचर?

काय आहे हा रोबोट लॅपटॉप

हे सुद्धा वाचा

Paytm चे मालक विजय शेखर शर्मा यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी याविषयीची पोस्ट केली आहे. Lenovo कॉन्स्पेप्ट लॅपटॉप त्यात दिसत आहेत. तुम्ही बोलताच हा लॅपटॉप काम सुरू करतो. त्याचे हिंज पण रोटोटे होतात. हा लॅपटॉप बैठकीसाठी अत्यंत उपयोगी आहे. त्यांनी एक्सवर या लॅपटॉपचा एक व्हिडिओ पण पोस्ट केला आहे. हा लॅपटॉप हात न लावता आपोआप उघडतो. आवाजाच्या मदतीने सुरू होतो आणि बंद होतो. या खास फीचरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

असा आहे Lenovo Laptop

Lenovo ने बर्लिनमध्ये सुरु असलेल्या IFA 2024 दरम्यान सादर केला आहे. हा लेनोवो कंपनीने या शोमध्ये Auto Twist AI PC सादर केला. यामध्ये मोटर सपोर्टेड हिंजचा वापर करण्यात आला आहे. ही हिंज मोटर्स व्हाईस कमांडवर काम करते. हे डिव्हाईस लॅपटॉप आणि टॅबलेट मोडमध्ये मिळते. हा AI-powered 2in-1 laptop आहे.

लेनोवोच्या या लॅपटॉपमध्ये फॉलो मी हे फीचर आहे. त्याच्या मदतीने युझर्सला तो ट्रॅक करतो. यामध्ये युझर्सच्या हालचाल, भावभावनानुसार लॅपटॉपची स्क्रीन फिरते. हे फीचर्स व्हिडिओ कॉलदरम्यान उपयोगी ठरते. कॉन्सेप्ट डिव्हाईस सादर करण्यात येत नाहीत. पण लेनोवो कम्युनिकेशनचे संचालक जेफ विट यांनी सांगितले की आम्ही त्यावर प्रयोग करत आहोत. अनेक कॉन्सेप्ट बाजारात सादर करण्यात येत नाही, तर त्याचे काही घटक बाजारात येतात.