Paytm Mall Holi Special | पेटीएम मॉलवर सेल सुरु, मोबाईल फोनपासून इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मिळेल 80 टक्के सूट

| Updated on: Mar 21, 2021 | 12:03 AM

होली स्पेशल सेलमध्ये 15,000 पेक्षा जास्त ब्रँडच्या उत्पादनांवर ग्राहकांना 80 टक्के सवलत, कॅशबॅक आणि आकर्षक ऑफर्स मिळतील. (paytm mall holi special sale start, get 80 percent discount on products)

Paytm Mall Holi Special | पेटीएम मॉलवर सेल सुरु, मोबाईल फोनपासून इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मिळेल 80 टक्के सूट
पेटीएम मॉलवर सेल सुरु
Follow us on

नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म पेटीएम मॉलने ग्राहकांना फायदा व्हावा यासाठी होळी विशेष महाशॉपिंग फेस्टिव्हल सेल जाहीर केला आहे. ही विक्री 20 मार्चपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. पेटीएम मॉलने या विक्रीसाठी अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआय आणि स्टँडर्ड बँकेबरोबर भागीदारी केली आहे. होली स्पेशल सेलमध्ये 15,000 पेक्षा जास्त ब्रँडच्या उत्पादनांवर ग्राहकांना 80 टक्के सवलत, कॅशबॅक आणि आकर्षक ऑफर्स मिळतील. (paytm mall holi special sale start, get 80 percent discount on products)

स्मार्टफोनवर शानदार ऑफर

कंपनीच्या म्हणण्यानुसार अॅपल, सॅमसंग, व्हिवो आणि ओप्पोच्या सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोनमध्ये 25 टक्के सूट आणि 5,000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळेल. यासह 9,600 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येईल. इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांबद्दल बोलताना 75 टक्के सूट आणि 3,000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक देण्यात येईल. त्याचबरोबर ग्राहकांना सर्व उत्पादने नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येतील.

सेलमध्ये लाखो उत्पादने उपलब्ध

पेटीएम मॉलने फेस्टीव्हल डोळ्यासमोर ठेवून एमएसएमई, मेड इन इंडिया ब्रँड्स आणि शासकीय संचालित एम्पोरियममधून लाखो उत्पादने उपलब्ध केली आहेत. तसेच कॉटेज एम्पोरियम, कारागीर, आणि महिला उद्योजकांनी बनवलेले हँडमेड दागिने, बनारसी आणि कांजीवाराम साड्या, हँड मेड कुर्ते, विविध राज्यांतील पारंपरिक पोशाख तसेच घर आणि स्वयंपाकघरातील सजावटीची उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

पेटीएमला व्हाट्सअप पेमेंटची कडवी टक्कर

पेटीएमला भारतीय बाजारात व्हॉट्सअ‍ॅपची कडवी टक्कर मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे हे फिचर गेल्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या सहकार्याने व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची रचना केली गेली आहे. हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वर आधारीत आहे. ते वापरण्यासाठी अँड्रॉईड आणि आयओएस वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपची नवीनतम आवृत्ती अपडेट करावी लागेल. तसेच, त्याच मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅप चालविला जाऊ शकतो, जो तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल.

व्हॉट्सअप पेमेंट सेटअप कसे कराल?

– व्हॉट्सअप ओपन करा, त्यानंतर सेटिंग ऑप्शनमध्ये जा
– येथे आपल्याला पेमेंट ऑप्शन दिसेल, यानंतर अॅड पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा
– यानंतर तुम्हाला बँक ऑप्शन सेलेक्ट करावे लागेल
– बँक सिलेक्ट केल्यानंतर आपला मोबाईल नंबर वेरिफाय करावा लागेल. यासाठी एसएमएस व्हेरीफिकेशन ऑप्शन निवडू शकता
– व्हेरीफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपली बँक डिटेल देय म्हणून जोडली जाईल

व्हॉट्सअप पेमेंट रजिस्ट्रेशननंतर आपण एकमेकांना पेमेंट पाठवू शकता. यासाठी आपल्याला व्हॉट्सअपमध्ये जाऊन पैसे पाठवावे आणि रिसिव्ह करावे लागतील. व्हॉट्सअप चॅट ओपन करावे लागेल. यानंतर अॅटॅचमेंट आयकॉन वर टॅप करावे लागेल. यानंतर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करुन मग एन्टर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला युपीआय पिनवर क्लिक करावे लागेल. (paytm mall holi special sale start, get 80 percent discount on products)

इतर बातम्या

Spring Season 2021 : वसंत ऋतुच्या स्वागतासाठी गुगलने बनविले खास डूडल

Special Report | देशमुखांकडून 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंग यांच्या आरोपानं सरकार हादरलं!