मुंबई : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी फिलिप्सने भन्नाट उपकरण आणलं आहे. फिलिप्सने असे स्मार्ट लाईट्स आणले आहेत, ज्यामुळे प्रकाश तर मिळेलच, पण त्या प्रकाशकिरणांपासून इंटरनेट डाटाही मिळणार आहे. वायफायसारखं असणाऱ्या या तंत्राला लाय-फाय (Li-Fi lights) असं नाव देण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या लायफायमधून लॅपटॉपसारख्या उपकरणांना तब्बल 150 mbps इतकं स्पीड मिळू शकतं.
फिलिप्सच्या मालकिच्या Signify ने Li-Fi सिस्टीम तयार केलं आहे. हे सिस्टीम LED बल्बसोबत फीट केलं जाईल. त्यानंतर या LED बल्बच्या खाली कुठलाही डिव्हाईस ठेवल्यावर तुम्हा हाय स्पीड इंटरनेटचा वापर करु शकता.
या Li-Fi सिस्टीमला Trulifi नाव देण्यात आलं आहे. या Li-Fi सिस्टीमला ऑन केल्यानंतर यूझरला एक USB अॅक्सेस Key डिव्हाईसला आपल्या लॅपटॉपशी जोडावं लागेल. यानंतर LED बल्बच्या लाईटने वायरलेस डाटा ट्रान्समीट होईल आणि तुम्ही फास्ट इंटरनेटचा वापर करु शकाल.
Trulifi Li-Fi सिस्टीमची गरज का?
वायरलेस डाटा ट्रान्समीट करण्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जसे की, कनेक्टीव्हिटी आणि सुरक्षा. त्यात या Trulifi Li-Fi सिस्टीमच्या माध्यमातून जिथपर्यंत या LED बल्बचा प्रकाश जाईल, तोपर्यंतच हाय स्पीड डाटा पोहोचेल. त्यामुळे कुणीही तुमचा डाटा चोरु शकणार नाही.
हाय स्पीड डाटा ट्रान्समीट होणार
Trulifi सिस्टीममध्ये एक ऑप्टिकल ट्रान्सरिसव्हरचा वापर करण्यात आला आहे. हा साधारणपणे 150 Mbps वायरलेस स्पीड देईल. गरज पडल्यास याच्या स्पीडला 250 Mbps पर्यंत ट्रान्समीट करता योईल, असं Signify कंपनीने सांगितलं.
संबंधित बातम्या :
‘ती’ माझी सर्वात मोठी चूक होती : बिल गेट्स
गुगलकडून 30 लाख अकाऊंट बंद, तुमच्या अकाऊंटचाही समावेश?
BSNL अडचणीत, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही
व्हॉट्सअॅपच्या पिक्चर-इन-पिक्चरमध्ये नवीन अपडेट, आता बॅकग्राऊंडमध्येही व्हिडीओ दिसणार