Marathi News Technology Pm narendra modi virat kohli sonu sood and anand mahindra top in indian twitter engagement in 2020
पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ Tweet चा वर्ल्ड रेकॉर्ड, जाणून घ्या मोदींसह ट्विटरवरील मेगास्टार कोण?
अनेक नेते, खेळाडू आणि बॉलिवूड सेलिब्रेटीजचा ट्विटरवर जलवा पाहायला मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 2020 मधील सर्वाधिक एंगेजमेंट्स मिळवणाऱ्या ट्विट्स आणि सेलिब्रेटीजबाबतची माहिती देणार आहोत.
1 / 6
राजकारणापासून ते बॉलिवूड आणि क्रिकेटपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील घटनांबाबत ट्विटरवर सतत चर्चा होत असतात. अनेक नेते, खेळाडू आणि बॉलिवूड सेलिब्रेटीजचा ट्विटरवर जलवा पाहायला मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 2020 मधील सर्वाधिक एंगेजमेंट्स मिळवणाऱ्या ट्विट्स आणि सेलिब्रेटीजबाबतची माहिती देणार आहोत.
2 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात फेसबुक आणि ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारे नेते आहेत. त्यांनी एप्रिल महिन्यात कोरोना वॉरियर्सच्या सन्मानार्थ देशात रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यांचं हे ट्विट 2020 मधलं सर्वात लोकप्रिय ट्विट ठरलं आहे. या ट्विटवर 1.18 लाख रिट्विट्स आले होते. वर्षभर मोदींचं ट्विटर अकाऊंट सर्वाधिक एंगेजमेंट मिळवणारं अकाऊंट ठरलं आहे. या अकाऊंटवर 76.65 लाखांहून अधिक एंगेजमेंट्स पाहायला मिळाल्या.
3 / 6
क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं ट्विटर अकाऊंट सर्वाधिक चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या अकाऊंटवर 17.76 लाखांहून अधिक एंगेजमेंट्स पाहायला मिळाल्या.
4 / 6
बॉलिवूड सेलिब्रेटीजच्या बाबतीत अभिनेता सोनू सूदने सर्व सुपरस्टार्सना मागे टाकत सर्वाधिक ट्विटर एंगेजमेंट्स मिळवल्या. त्याच्या टि्वटर एंगेजमेंट्स 13.84 लाखांहून अधिक होत्या.
5 / 6
प्रादेशिक सिनेमाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तेलुगू अभिनेता महेश बाबूचा ट्विटरवर जलवा पाहायला मिळाला. 2020 मध्ये त्याच्या ट्विटर एंगेजमेंट्स 9.14 लाखांहून अधिक होत्या.
6 / 6
व्यावसायिकांच्या बाबतीत आनंद महिंद्रा यांच्या ट्विटर एंगेजमेंट्स सर्वाधिक (4 लाखांहून अधिक) होत्या.