मुंबई : शाओमीचा Poco F1 हा पावरफूल प्रोसेसर असलेला एक स्मार्टफोन आहे. याची किंमत 20 ते 25 हजाराच्या आत आहे. यामध्ये क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसोसर देण्यात आलं आहे. हा फोन 6GB रॅम आणि 8GB रॅममध्ये उपलब्ध आहे. तसं तर या स्मार्टफोनमध्ये अनेक फिचर्स आहेत, मात्र एका रिपोर्ट नुसार हा स्मार्टफोन चक्क आयफोन-8 च्या क्वॉलीटीचे फोटो घेतो.
DxOMark हे एक पोर्टल आहे, यावर कॅमेरा परफॉर्मन्स तपासले जातात. यावरील तपासण्यांच्या निकालावर अनेक कंपन्या तसेच तज्ञही विश्वास ठेवतात. याच पोर्टलवरील एका रिपोर्टनुसार, Poco F1 या स्मार्टफोनने घेतलेल्या फोटोची क्वॉलिटी ही आयफोन-8 सारखी आहे.
DxOMark च्या रिपोर्टमध्ये Poco F1 ला 91 पॉईंट मिळाले आहेत. हे पॉईंट गुगल पिक्सल आणि आयफोन-8 च्या बरोबरीचे आहे. आयफोन-8 चा स्कोर पॉईंट 92 आहे, तर गुगल पिक्सलचा 90 आहे. Poco F1 मध्ये दोन रीअर कॅमेरे देण्यात आले आहेत. याचा प्रायमरी लेन्स 12 मेगापिक्सलचा आहे, तर दुसरा लेन्स 5 मेगापिक्सलचा आहे.
DxOMark नुसार, ऑटोफोकस परफॉर्मन्स, फ्लॅश पिक्चर्स आणि प्लेजंट कलर्स हे Poco F1 चे खास वैशिष्ट्य आहे. कुठल्याही प्रकारच्या प्रकाशात याची फोटो क्वॉलिटी उत्कृष्ट आहे. इंडोर किंवा आऊटडोरमध्ये याचा एस्कपोझर अचूक आहे.
Poco F1 हा जबरदस्त फोटो घेऊ शकतो, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या फोनमध्ये टेली लेन्स देखील देण्यात आला आहे, याने झूम करता येतं. पण झूम केरुन फोटो काढण्यात Poco F1 तेवढा चांगला नाही. Poco F1 मधील एचडीआर प्रोसेसिंग हे इतर बेस्ट प्रोसेसिंग स्मार्टफोनच्या तुलनेत समाधानकारक नाही. मात्र याच्या कॅमेराची विशेषता म्हणजे हा डिटेल्स कॅप्चर करण्यात खूप चांगला आहे. त्यामुळे या प्राईजमध्ये Poco F1 चा कॅमेरा गुगल पिक्सल आणि आयफोन-8 लाही टक्कर देत असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.