मुंबई : भारतात एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन आहेत. असं असलं तरी कायमच नव्या स्मार्टफोनबाबत उत्सुकता असते. नव्या फोनमधील फीचर्स, किंमत आणि इतर स्पेसिफिकेशनबाबत कुतुहूल असतं. अशीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पोको एफ5 5जी स्मार्टफोनबाबत आहे. हा स्मार्टफोन आज (9 मे 2023 ) संध्याकाळी भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह येणार असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. कंपनीने या स्मार्टफोनबाबत काही माहिती ट्वीट करून जाहीर केली आहे.
हा पहिला ग्लोबल फोन आहे की, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन गेम खेळणाऱ्या युजर्ससाठी जबरदस्त आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी इतर काही गोष्टी यामुळे आणखी बेस्ट मिळतील असा दावा आहे.
पोको F5 5G स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांच्या आत असू शकते. लीक्सनुसार या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत 28 हजार ते 29 हजार रुपयांच्या दरम्यान असेल, असा दावा करण्यात आला आहे. पोको F4 हा स्मार्टफोन 30 हजारांच्या असल्याने असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे हा स्मार्टफोन ग्राहकांना 11 मे पासून खरेदीसाठी उपलब्ध असू शकतो. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या स्मार्टफोनची नोंदणी करता येईल.
Why stress out? Best believe the F’in King will top this test, for a long long time. ?#POCOF5 global debut on 09.05.2023 @ 5:30PM.#ReturnOfTheKing pic.twitter.com/uLGc4EAuhH
— POCO India (@IndiaPOCO) May 7, 2023
Poco F5 5G या स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसर असेल असं कंपनीने आधीच सांगितलं आहे. क्वालकॉने स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 चिपसेटची घोषणा मिड रेंज स्मार्टफोनसाठी केली होती. त्यामुळे हा स्मार्टफोन चांगली कामगिरी करेल असा दावा पोको इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर अधिक माहिती मिळेल.
हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध असेल कार्बन ब्लॅक आणि स्नोस्टॉर्म व्हाईट अशा रंगात असेल. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रीयर कॅमेरा सेटअप आहे. यात 64 एमपी कॅमेरा हायपर स्टॅबिलिटीसह असेल. त्यामुळे फोटो एकदम क्लियर क्लिक होतील. हा स्मार्टफोन 30 व्हॅट वायरलेस चार्जिंगसह असेल.
लीक्सनुसार, यात 6.7 इंचाची एफएचडी अमोलेड डिस्प्ले पंच होल नॉच डिजाईनसह असेल. यात 120 एचझेड रिफ्रेश असेल. या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी असण्याची शक्यता आहे.
कंपनी Poco F5 5G स्मार्टफोनचं लाईव्ह स्ट्रिमिंग युट्यूब चॅनेलवर करेल. संध्याकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. त्याचबरोबर पोकोच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला या स्मार्टफोनची माहिती मिळेल.