नवी दिल्लीः Poco एक नवीन स्मार्टफोन Poco M4 5G भारतात लॉंच (Launched in India)करीत आहे. हा फोन, कंपनीच्या M4-सीरीजमध्ये Poco M4 Pro आणि Poco M4 Pro 5G सह सामील होईल. समोर आलेल्या माहितीनुसार, Poco M4 5G च्या मागील बाजूस दोन कॅमेरा सेन्सर असतील, त्यापैकी एक 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर असेल. Poco इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने (Official Twitter account) एका ट्विटद्वारे सांगितले की, Poco M4 5G स्मार्टफोन 29 एप्रिल 2022 रोजी भारतात लॉंच होईल. ट्विटनुसार, हा फोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून (Via Flipkart) विकला जाईल. कंपनीने पोस्टमध्ये या डिवाइसचे डिझाईन देखील दाखवले आहे. हा फोन पिवळा आणि निळा या दोन कलर व्हेरियंटमध्ये दिसणार आहे.
मागील बाजूस दोन कॅमेरा सेन्सर आहेत. कॅमेरा मॉड्युल हा फोनच्या एका टोकापासून
दुस-या टोकापर्यंत एक काळी पट्टी आहे. यावर पोको ब्रँडिंग देखील आहे. फोनच्या खालच्या बाजूला 5G लिहिलेले आहे.
Poco M4 5G चे स्पेसिफिकेशन्स आधीच लीक झाले आहेत. योगेश ब्रार यांच्या मते, या डिव्हाइसमध्ये 6.58-इंचाची FHD + LCD स्क्रीन असेल, जी 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह सुसज्ज असेल, जो 4GB / 6GB LPDDR4X RAM आणि 64GB / 128GB UFS2.2 स्टोरेजसह जोडला जाईल. लीकनुसार, Poco M4 5G च्या मागील बाजूस दोन कॅमेरा सेन्सर असतील, त्यापैकी एक जो 50MP आहे. एक प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर असेल. फोनमध्ये समोर 5MP सेल्फी कॅमेरा असू शकतो.
हाती आलेल्या माहितीनुसार, बॉक्समधून बाहेर येताच हा डिवाइस Android 12 वर तयार केलेल्या MIUI 13 वर काम करेल. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी असू शकते, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. असेही म्हटले जात आहे की Poco M4 5G स्मार्टफोन हा Redmi Note 11E ची रीब्रँडेड व्हर्जन असेल, जी Xiaomi ने काही काळापूर्वी चीनमध्ये सादर केली होती. आतापर्यंत, Poco डिव्हाइसबद्दल आढळलेले निर्देश Redmi Note 11E शी जुळत असल्याचीही चर्चा आहे.