मुंबई : POCO भारतात आपला नवा स्मार्ट फोन लॉन्च करत आहे, ज्याचं नाव असेल poco M4 5G असणार आहे. हा स्मार्टफोन भारतात 29 एप्रिल म्हणजेच आज लॉन्च होणार आहे. तशी माहिती कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलीय. या स्मार्टफोनची भारतातील किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप तरी किंमतीबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. यात बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची संभाव्य वैशिष्ट्ये आणि अन्य माहिती जाणून घेऊया.
Poco M4 5G चं डिझाईनही दमदार असेल आणि स्पीडबाबतही हा एक चांगला स्मार्टफोन असेल असा दावा खुद्द कंपनीनेच केलाय. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आलं आहे, ज्यात बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. तर Poco M3 मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे.
कंपनीने आतापर्यंत हा स्मार्टफोन समोरून दाखवलेला नाही किंवा त्याचा एखादा फोटोही बाहेर आणलेला नाही. बजेट स्मार्टफोन असल्यामुळे यात वॉटरड्रॉप स्टाईलचा कॅमेरा कटआऊट मिळेल. हे डिझाईन Poco M3 प्रमाणे असल्याचं वाटतं. हा स्मार्टफोन यलो आमि ब्ल्यू या दोन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.
सुरु असलेल्या चर्चेनुसार अपकमिंग स्मार्टफोन Poco M4 5G चं स्पेसिफिकेशन Poco M3 Pro 5G मॉडेलशी मिळते जुळते असण्याची शक्यता आहे. Poco M4 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सटी 700 चिपसेट मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यात बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यात प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे, जो मॅक्रो सेन्सर आहे. तर समोरच्या बाजूला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय.