मुंबई : जगभरातील पबजी मोबाईल गेमप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अशी माहिती मिळाली आहे की, Krafton सध्या पाब्जी मोबाईलच्या सिक्वेलवर काम करत आहे आणि या गेमचे निर्माते लवकरच हा गेम लॉन्च करण्याची योजना आखत आहेत. या नव्या पबजी गेमला किंवा त्याच्या सिक्वलेला पबजी मोबाइल 2 (PUBG Mobile 2) असं नाव देण्यात येईल. (Pubg Mobile 2 to launched in next week, know features and expectations)
दरम्यान, PlayerIGN ट्विटरवरील वीबो पोस्टद्वारे (जी आता काढून टाकली आहे) दावा करण्यात आला आहे की पबजी मोबाइल 2 पुढील आठवड्यात काही नवीन वैशिष्ट्यांसह (फीचर्ससह) बाजारात दाखल केला जाईल. काही दिवसांपूर्वी एका अहवालामधून असे स्पष्ट करण्यात आले होते की, हा गेम यावर्षी जूनमध्ये लाँच होणार आहे. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, याला एक नवीन मानचित्र मिळेल. नवीन स्टाईल आणि बर्याच नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज असा गेम लवकरच लाँच केला जाईल. गुगल प्ले स्टोअर आणि Apple App Store या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांसाठी (युजर्ससाठी) PUBG Mobile 2 उपलब्ध असेल.
PUBG Mobile 2 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये अनेक नवीन फीचर्स अपेक्षित आहेत. असे सांगितले जात आहे की PUBG Mobile 2 मध्ये ड्रोन आणि डिप्लॉयबल बंकर उपलब्ध असतील. असे फीचर्स मोठ्या बॅटल रॉयल गेम्समध्ये असतात. दरम्यान असं म्हटलं जातंय की, लाँचिंगच्या वेळी पबजी मोबाइल 2 जागतिक स्तरावर उपलब्ध होणार नाही. गेमची विकासक कंपनी क्राफ्टॉन (Krafton) पुढील आठवड्यात या गेमची घोषणा करु शकते. हा गेम सुरुवातीला बीटा टेस्टिंगसाठी उपलब्ध असेल आणि नंतर काही आठवडे किंवा काही महिन्यांनंतर या गेमचं फुल व्हर्जन लाँच केलं जाईल.
याआधी अनेक लीक्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, लवकरच क्राफ्टॉन (Krafton) कंपनी एका नवीन शीर्षकासह नवा गेम किंवा नव्या व्हर्जनसह पबजी गेम लाँच करु शकते. पबजी मोबाइल 2 देखील जुन्या पबजी गेमसारखाच असू शकतो. यापूर्वी समोर आलेल्या लीकमध्ये हे उघड झाले आहे की, गेमची दुसरी आवृत्ती (दुसरं व्हर्जन) कंप्युटर, गेमिंग कन्सोल आणि मोबाईलमध्ये क्रॉस-प्लॅटफॉर्मला सपोर्ट करेल. पबजी गेमचं सेकेंड व्हर्जन भारतातही लाँच होऊ शकतं, अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.
भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चार महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अॅपसह 118 चिनी अॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून हा गेम नेमका कधी लाँच होणार याची पबजी गेमच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान हा मोबाईल गेम पुढील आठवड्यात नव्या व्हर्जनसह लाँच केला जाऊ शकतो, असा दावा काही लीक्समध्ये करण्यात आला आहे.
एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.
हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.
संबंधित बातम्या
बॅन झालेल्या PUBG ला पछाडत ‘या’ नव्या गेमचा जगभरात डंका, छप्परफाड कमाई
चीटिंग करणाऱ्या युजर्सना PUBG चा दणका, 12 लाख अकाऊंट्स बॅन
(Pubg Mobile 2 to launched in next week, know features and expectations)