भारतातून बाजार उठला तरीही कमाईत अव्वल, PUBG Mobile चा जलवा कायम

| Updated on: Feb 08, 2021 | 6:23 PM

भारत हे PUBG Mobile गेमसाठीचं सर्वात मोठं मार्केट आहे आणि हा गेम भारतातच बॅन झाल्यानंतर गेम बनवणाऱ्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल असं बोललं जात होतं.

भारतातून बाजार उठला तरीही कमाईत अव्वल, PUBG Mobile चा जलवा कायम
जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार पबजी?
Follow us on

मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चार महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. भारत हे PUBG Mobile गेमसाठीचं सर्वात मोठं मार्केट आहे आणि हा गेम भारतातच बॅन झाल्यानंतर गेम बनवणाऱ्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल असं बोललं जात होतं. परंतु तसं झालेलं नाही. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या मोबाईल गेम्सच्या यादीत पबजी मोबाईल गेम पहिल्या स्थानावर आहे. Sensor Tower च्या रिपोर्टनुसार 2020 मध्ये चीनी मोबाईल गेम्सने मोठ्या प्रमाणात पैसे कमावले आहेत. (PUBG Mobile is number one game in terms of earnings despite ban in India)

मोबाईल अॅप डेटा एनालिसिस फर्म Sensor Tower च्या लिस्टमध्ये सर्वात जास्त ग्रोथ (Growth) करणाऱ्या गेम्समध्ये PUBG Mobile पहिल्या नंबरवर आहे. जागतिक बाजारात पबजी मोबाईलने 1.06 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. दरम्यान, चीनच्या 30 मोबाईल गेम्सचं उत्पन्न 47 टक्क्यांनी वाढले आहे. अशा परिस्थितीत या गेम्सचे मूल्य 6.3 अब्ज डॉलर्सवरुन (वर्ष 2019) वरून 9.3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे. जागतिक बाजारात चीनमधील 37 अॅप्सनी 100 मिलियन (10 कोटी) डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली आहे, 2019 च्या तुलनेत हा आकडा 12 पट जास्त आहे. आता परदेशी बाजारपेठ (जपान) चीनी पब्लिशर्ससाठी महत्त्वाची ठरत आहे.

PubG Mobile India लवकरच लाँच होणार

पबजी इंडिया हा गेम कधी लाँच केला जाणार? याबाबतची अधिकृत माहिती कंपनीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. काही वबसाईट्स आणि पबजी कंटेट क्रिएटर्स दररोज वेगवेगळे दावे करत आहेत. परंतु पबजी कॉर्पोरेशनने अद्याप याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. तसेच भारत सरकारडूनही याबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.

PubG भारतात रजिस्टर

मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारने PUBG Mobile India या गेमला अप्रूव्ह केलं आहे. PUBG Mobile India Private Ltd. या नावाने हा गेम भारतात रजिस्टर केला आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट अफेयर्सच्या वेबसाईटवर हा गेम CIN सह रजिस्टर करण्यात आला आहे. हा गेम केवळ भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी PUBG Corporation चिनी कंपनी Tenncent सोबत कोणतीही भागिदारी करणार नाही. दरम्यान अद्याप या गेमच्या लाँचिंगसाठी भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळणं बाकी असल्याची माहिती काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केली आहे.

PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

PUBG Mobile India भारतात कधी लाँच होणार?

चीटिंग करणाऱ्या युजर्सना PUBG चा दणका, 12 लाख अकाऊंट्स बॅन

(PUBG Mobile is number one game in terms of earnings despite ban in India)