मुंबई : पबजी मोबाईल (PUBG Mobile) आणि पबजी मोबाईल लाईट (PUBG Mobile Lite) हे दोन्ही गेमिंग अॅप्स आजपासून (30 ऑक्टोबर) भारतात पूर्णपणे बंद होणार आहेत. कंपनीने गुरुवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. भारतात महिन्याभरापूर्वी सुरक्षेच्या कारणावरुन तब्बल 118 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट या दोन गेमिंग अॅप्सचा समावेश होता. (PUBG mobile will no longer active in India from october 30)
पबजी मोबाइल गेमचे मालकी हक्क असणाऱ्या टॅन्सेंट गेम्स (Tencent Games) य कंपनीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “पबजी गेम भारतात पूर्णतः बंद केला जातोय, ही फार खेदाची बाब आहे”. यासोबत त्यांनी भारतातील पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट या गेमच्या चाहत्यांचे आणि गेमचे समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
कंपनीने म्हटलं आहे की, आमच्या युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणे ही नेहमीच आमची प्राथमिकता राहिली आहे. आम्ही नेहमीच भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे पालन केले आहे. टॅन्सेंट गेम्सने निवेदनात असेही म्हटले आहे की, आमच्या प्रायव्हसी पॉलिसित असे म्हटले आहे की, सर्व युजर्सची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रोसेस केली जाते. तसेच टॅन्टेंट कंपनी पबजी मोबाईल विकसित करणारी कंपनी पबजी कॉर्पोरेशनला (क्राफ्ट्स गेम यूनियनच्या मालकीची कंपनी) सर्व हक्क परत करत आहेत.
चिनी कंपनीचं नुकसान
या अॅप्सवर बंदी घातल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कंपनीची मार्केट व्हॅल्यू (Tencent Market Value) तब्बल 34 अब्ज डॉलर्सने कमी झाली. टॅन्सेंट कंपनी पबजी गेमिंग अॅपद्वारे भारतात सर्वाधिक पैसे कमवत होती. या गेममध्ये दररोज सुमारे 3 कोटी सक्रिय युजर्स होते. या गेमच्या सर्वाधिक सक्रिय युजर्सच्या बाबतीत भारत अव्वल स्थानावर होता. त्यामुळेच टॅन्सेंट कंपनी देशात सर्वाधिक कमाई करत होती.
पबजी हा गेम एक महिन्यापूर्वीच प्ले स्टोर आणि अॅपल स्टोरमधून हटवण्यात आला आहे. परंतु ज्या युजर्सनी यापूर्वीच हा गेम त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करुन ठेवला होता, त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अजूनही हा गेम अॅक्टिव्ह होता. परंतु आजपासून हा गेम त्यांच्या मोबाईलमध्ये चालणार नाही.
संबंधित बातम्या
PUBG गेम खेळू दिला नाही, मुलाने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले
ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला, पोराने PUBG गेममध्ये 16 लाख उडवले
तुमच्या मोबाईलमधील PubG सह Banned Chinese अॅप्सचं पुढे काय होणार?
PUBG ला आता FAU-G चा पर्याय, अक्षय कुमारकडून मोठी घोषणा
(PUBG mobile will no longer active in India from october 30)