नवी दिल्ली | 21 January 2024 : अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होत आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, राम मंदिराच्या उभारणीचे काम करत आहे. हा ट्रस्ट केंद्र सरकारने तयार केला आहे. राम मंदिरात दान करण्यासाठी ही अधिकृत संस्था आहे. भाविक भक्त ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने दान करु शकता. अथवा प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर त्यांना अयोध्येत जाऊन दान करता येईल. राम मंदिराच्या बांधणीसाठी भाविकांना, नागरिकांना खारीचा वाटा उचलता येईल. युपीआय, क्यूआर कोड, एनईएफटी, आयएमपीएस, डिमांड ड्राफ, धनादेश याद्वारे भक्तांना दान करता येईल. विशेष म्हणजे एका ठराविक रक्कमेवर आयकर अधिनियमातंर्गत त्यांना कर सवलतीचा लाभ घेता येईल.
पण पावती नाही मिळणार लगेच
तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर दान करत असाल तर एक महत्वाची नोंद ठेवा. दान केल्यानंतर त्या रक्कमेची पावती लागलीच तुम्हाला मिळणार नाही. युपीआय, क्यूआर कोड, एनईएफटी, आयएमपीएस, डिमांड ड्राफ, धनादेश याद्वारे दान केले असेल तर पावतीसाठी तुम्हाला काही काळ प्रतिक्षा करावी लागेल. पावती डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला 15 दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पावती डाऊनलोड करता येईल.
इनकम टॅक्समध्ये असा फायदा
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला केंद्र सरकारने ऐतिहासिक स्थान आणि प्रसिद्ध सार्वजनिक पुजेचे स्थळ म्हणून नोटिफाय केले आहे. त्यामुळे जी व्यक्ती या मंदिराला दान देईल, त्या रक्कमेवर आयकर खात्यातंर्गत कर सवलतीस पात्र ठरेल. दानातील अर्धी रक्कम आयकर अधिनियमाच्या 80 जी (2) (बी) अंतर्गत डिडक्शनास पात्र असेल. पण 2000 रुपयांच्या वरील रक्कमेवर टॅक्स डिडक्शनचा लाभ घेता येणार नाही. दोन हजार रुपयांच्या रक्कमेवर नियमानुसार, कर सवलतीचा लाभ घेता येईल.
कसे करता येईल दान