मुंबई : जबरदस्त फिचर्स असलेला Realme 6 हा स्मार्टफोन ग्राहकांना अवघ्या 9,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्ट बिग दिवाली सेल 2020 (Flipkart Big Diwali Sale 2020) मध्ये ग्राहकांना बंपर डिस्काऊंट दिला जात आहे.
रियलमी 6 हा स्मार्टफोन 12,999 रुपयांच्या किंमतीसह लाँच करण्यात आला होता. परंतु जीएसटी वाढल्यामुळे त्याची किंमत 14,999 रुपये झाली. फ्लिपकार्टवर हा फोन ऑफरसह 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सोबत अॅक्सिस बँकेकडून डिस्काऊंट दिला जातोय. त्यामुळे हा फोन ग्राहक 9,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. ज्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये दमदार फिचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, अशा ग्राहकांसाठी Realme 6 हा चांगला पर्याय आहे.
Realme 6 मध्ये खास काय?
रियलमी 6 मध्ये 6.4 इंचांचा कलरफुल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले खास चित्रपट पाहणाऱ्यांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. रियलमीमध्ये तुम्हाला मीडियाटेक हीलियो G90T (MediaTek Helio G90T) प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसर गेमिंगसाठीदेखील दमदार आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीतही हा फोन जबरदस्त आहे. यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यापैकी पहिला 64 मेगापिक्सल, दुसरा 8 मेगापिक्सल, तिसरा 2 मेगापिक्सल आणि चौथादेखील 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे.
फोनची बॅटरी 4300mAh क्षमतेची आहे. ही बॅटरी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी फुल्ल चार्ज करण्यासाठी तुम्हाल एक ते दोन तास फोन चार्जिंगला लावून बसण्याची गरज नाही.
Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन उद्या लाँच होणार
प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ऑनर (Honor) चा Honor 10X Lite हा स्मार्टफोन 10 नोव्हेंबर रोजी जगभरात लाँच केला जाणार आहे. कंपनीने अधिकृतपणे या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. परंतु लिक्सद्वारे फोनचे लुक्स आणि काही फिचरबाबत माहिती मिळाली आहे. Honor 10X लाईट हा स्मार्टफोन Honor 9X चं पुढील व्हर्जन आहे. हा फोन यावर्षी एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आला होता. हा फोन ग्रीन आणि पर्पल या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
लिक्सद्वारे माहिती मिळाली आहे की, हा स्मार्टफोन MagicUI 3.1 आधारित अँड्रॉयड 10 वर काम करेल. फोनमध्ये 6.67 इंचांचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1080×2400 पिक्सल रेजॉल्यूशन सपोर्टेड आहे. यामध्ये किरिन 710A प्रोसेसर दिला जाणार आहे. तसेच 4 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज स्पेस (इंटर्नल मेमरी) दिली जाईल.
Honor 10X लाइटमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. उर्वरित तीन कॅमरे 8, 2 आणि 2 मेगापिक्सलचे असतील. फोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असेल. तसेच फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे, जी 22.5 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
संबंधित बातम्या
48MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट
Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती
5G सपोर्टसह Oppo K7x स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
(Realme 6 available under 10000 Rupees on flipkart diwali deal of the day)