50MP कॅमेरा, 18W पॉवर अडॅप्टरसह Realme चा बजेट स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

| Updated on: Mar 06, 2022 | 9:20 PM

रियलमी (Realme) ही चिनी मोबाईल निर्माती कंपनी भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. रियलमी सी 35 (Realme C35) असं या स्मार्टफोनचं नाव असून कंपनीने या फोनची रिलीज डेट फायनल केली आहे. नवा फोन कंपनीच्या सी सीरीजमधील परवडणारं नवीन मॉडेल असेल. 7 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता मोबाईल लाँच केला जाईल.

50MP कॅमेरा, 18W पॉवर अडॅप्टरसह Realme चा बजेट स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Realme C35 - या फोनची किंमत भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते.
Follow us on

मुंबई : रियलमी (Realme) ही चिनी मोबाईल निर्माती कंपनी भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. रियलमी सी 35 (Realme C35) असं या स्मार्टफोनचं नाव असून कंपनीने या फोनची रिलीज डेट फायनल केली आहे. नवा फोन कंपनीच्या सी सीरीजमधील परवडणारं नवीन मॉडेल असेल. 7 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता मोबाईल लाँच केला जाईल. या मोबाईलमध्ये 50MP मेन सेन्सर, मॅक्रो सेन्सर आणि प्रोटोटाइप दोन कॅमेऱ्यांसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हा फोन फुल एचडी + डिस्प्ले ऑक्टा-कोअर प्रोसेसरसह (Octa Core Processor)येईल. हा मोबाईल पहिल्यांदा थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला होता. तिथली या फोनची सुरुवातीची किंमत 5,799 Thai baht (जवळपास 13,350 रुपये) इतकी आहे. मात्र काही टेक तज्ज्ञांच्या मते या फोनची किंमत भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. कंपनीच्या मते, Realme C35 हा फोन एक रीफ्रेश डिझाइन, चांगली बॅटरी आणि चांगल्या कॅमेरा क्वालिटीसह येतो.

Realme ने या फोनबाबत म्हटलं आहे की, “Realme C35 50MP AI ट्रिपल कॅमेरासह सुसज्ज असेल, हा कॅमेरा युजर्सना डीटेल्ड आणि चांगल्या इमेज कॅप्चर करण्यास सक्षम करेल. हा Realme C सीरीज लाइन-अपमधील पहिला असा फोन आहे जो FHD 6.6-इंच स्क्रीनसह येतो. Realme C35 हा C-सिरीज मधील सर्वात पातळ आणि हलका स्मार्टफोन देखील आहे, ज्यामध्ये 8.1mm बिल्ड आणि 187g लाइट बॉडी आहे.

Realme C35 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

कंपनीचे म्हणणे आहे की, या फोनची बॅटरी लाईफ आणखी वाढवण्यासाठी यात सुपर पॉवर सेव्हिंग मोड फीचर आहे. Octacore Unisoc T616 (Unisoc T616) प्रोसेसर Realme C35 मध्ये असण्याची शक्यता आहे. फोन 5000 mAh बॅटरी आणि 18 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. Realme C35 2GB आणि 3GB रॅम पर्यायांमध्ये येण्याची अपेक्षा आहे. हा फोन ऑफलाइन रिटेलर्ससोबत फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवर लॉन्च केला जाईल.

Realme लवकरच 9 सिरीजमध्ये दोन नवीन फोन लॉन्च करणार

C35 व्यतिरिक्त, Realme ने भारतीय बाजारपेठेसाठी सिरीज 9 स्मार्टफोनची देखील घोषणा केली आहे. सिरीज 9 मध्ये दोन नवीन स्मार्टफोन मिळण्याची शक्यता आहे आणि ते 10 मार्च रोजी नवीन स्मार्टवॉच आणि नवीन इअरबड्ससह लॉन्च केले जातील.

याव्यतिरिक्त, Realme ने MWC 2022 मध्ये 150W चार्जर आणि GT 2 Pro स्मार्टफोनचे अनावरण केले आहे, जे Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सुसज्ज आहे. Realme ने GT Neo 3 नावाचा नवीन स्मार्टफोन देखील जाहीर केला आहे. GT Neo 3 ला MediaTek चा नवीन लाँच केलेला Dimensity 8100 चिपसेट मिळणार आहे.

इतर बातम्या

नवीन मोबाईल खरेदी करताय? मोबाईल खरेदी करताना गोंधळ उडालाय, मग ही माहिती वाचाच

स्टारलिंक सॅटेलाईट सिस्टमचा सावधानतेने वापर करा;स्पेसएक्सचा सीईओ एलन मास्कचे आवाहन; रशिया करु शकते गैरवापर

अ‍ॅमेझॉनवर Apple iPhone 12 मिळत आहे एकदम स्वस्तात, काय आहे कॅशबॅक आणि एक्सेंझ ऑफर जाणून घ्या…