मुंबई : फ्लिपकार्टवरील (Flipkart) डेडिकेटेड पेजद्वारे रियलमी (Realme) कंपनीने आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या लाँचिंगची पुष्टी केली आहे. कंपनी 31 मे रोजी Realme X7 Max स्मार्टफोन लाँच करणार आहे. ऑनलाइन लिस्टिंगद्वारे Realme X7 Max 5G च्या फीचर्सची माहिती मिळाली आहे. (Realme X7 Max 5G going launch in India on May 31m will be awailable on Flipkart)
नवीन 5G स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंशन 1200 चिपसह येईल आणि ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल. ई-कॉमर्स साइटने स्मार्टफोनच्या Antutu स्कोअरचाही खुलासा केला आहे, जो 7,06,000 पेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. Realme ने नव्या स्मार्टफोनसाठी रेसिंग गेम Asphalt 9 Legends सह भागीदारी केली आहे, फ्लिपकार्टवरील डेडिकेटेड पेजवर याबाबत पुष्टी करण्यात आली आहे.
ऑनलाइन लाँचिंग कार्यक्रमाचा एक भाग म्हणून Realme कंपनी 31 मे रोजी रात्री 12:30 वाजता Realme X7 Max स्मार्टफोन लॉन्च करेल. सुरुवातीला हा हँडसेट 4 मे रोजी लॉन्च केला जाणार होता, परंतु देशभरातील कोव्हिड-19 संकटामुळे कंपनीने लाँचिंग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात Realme X7 Max 5G ची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांदरम्यान सांगण्यात आली आहे. हा फोन Realme GT Neo रीब्रँडेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे. कंपनीने जारी केलेल्या टीझरनुसार या लाँचिंग इव्हेंटमध्ये कंपनी रियलमी स्मार्ट टीव्ही 4 के सिरीजसुद्धा लाँच करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
इतर बातम्या
वीजेशिवाय चालणारे AC बाजारात, दर महिन्याला 4200 रुपयांच्या वीजबिलाची बचत करणार
Flipkart Electronic sale : सॅमसंग, रियलमी आणि पोकोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट
48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…
(Realme X7 Max 5G going launch in India on May 31m will be awailable on Flipkart)