मुंबई : Realme X7 Max 5G हा भारतातील 5G फोनच्या श्रेणीत लाँच होणारा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये रियलमीने X7 Max 5G हा स्मार्टफोन भारताचा पहिला डायमेंशन 1200 पॉवर्ड स्मार्टफोन म्हणून लाँच केला. हा चिपसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 च्या बरोबरीचा नाही, परंतु हा स्नॅपड्रॅगन 870 सारख्या काही कमी चिपसेटवर काम करू शकेल, जो बहुतेक ग्राहकांसाठी पुरेसा असेल. (Realme X7 Max 5G launched in India with Dimensity 1200, 120Hz AMOLED display, 50W charging)
कंपनीने म्हटले आहे की, Realme X7 Max 5G ग्राहकांना प्रीमियम अनुभव प्रदान करेल. X7 Max 5G सोबत रियलमीने एक नवीन स्मार्ट टीव्ही देखील लाँच केला आहे. नेटफ्लिक्स आणि डिस्ने + हॉटस्टार सारख्या स्ट्रीमिंग अॅप्ससाठी डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस स्टँडर्ड देण्यात आले आहेत. कोरोना काळात बरेच लोक त्यांच्या घरात राहत असल्याने मोठ्या स्क्रीनच्या डिव्हाईसेसची विक्री वाढली आहे आणि ती मागणी पुरवण्याचं काम Realme कडून सुरु आहे.
नवीन 5G स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंशन 1200 चिपसह येईल आणि ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल. ई-कॉमर्स साइटने स्मार्टफोनच्या Antutu स्कोअरचाही खुलासा केला आहे, जो 7,06,000 पेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. Realme ने नव्या स्मार्टफोनसाठी रेसिंग गेम Asphalt 9 Legends सह भागीदारी केली आहे, फ्लिपकार्टवरील डेडिकेटेड पेजवर याबाबत पुष्टी करण्यात आली आहे.
भारतात Realme X7 Max 5G च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्याय असलेल्या स्मार्टफोनची किंमत 26,999 रुपये आणि 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. फोन एस्टेरॉयड ब्लॅक, मर्करी सिल्व्हर आणि मिल्की वे कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे Realme X7 Max 5G चा पहिला सेल 4 जून रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी ऑनलाइन स्टोअरवर सुरू होईल.
इतर बातम्या
वीजेशिवाय चालणारे AC बाजारात, दर महिन्याला 4200 रुपयांच्या वीजबिलाची बचत करणार
Flipkart Electronic sale : सॅमसंग, रियलमी आणि पोकोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट
48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…
(Realme X7 Max 5G launched in India with Dimensity 1200, 120Hz AMOLED display, 50W charging)