मुंबई : रियलमी X7 आणि X7 प्रो (Realme X7 and X7 Pro) हे दोन स्मार्टफोन्स 7 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच केले जाणार आहेत. रियलमी कंपनीने नवीन फ्लॅगशिप फोनसाठी स्पेशल मीडिया इन्व्हाईट पाठवण्यास सुरुवात केली आहे. कंपनी हा फोन 5G फ्लॅगशिप फोन म्हणून लाँच करणार आहे. रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या फोनच्या लाँचिंगबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे. (Realme X7 series India launch set for Feb 4, X7 Pro features confirmed on Flipkart)
फ्लिपकार्टने या फोनसाठी डेडिटेकेटे़ड रियलमी X7 प्रो लाँच पेजदेखील बनवलं आहे. या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 1000+ 5G प्रोसेसर दिला जाणार आहे. फ्लॅगशिप चिपमध्ये 7nm प्रोसेसर दिला जाईल. तसेच हा फोन स्नॅपड्रॅगन 865 SoC सह सादर केला जाईल. फ्लिपकार्ट पेजवरुन मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 6.55 इंचांचा अमोलेड डिस्प्ले दिला जाणार असून या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हार्ट्ज इतका असेल. तसेच या फोनची बॅटरी 64 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 8 मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड कॅमरा, 64 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स, 2 मेगापिक्सलची पोट्रेल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळेल. तसेच या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) दिला जाईल.
रियलमी X7 मध्ये 6.55 इंचांचा सुपर एमोलेड HD डिस्प्ले दिला जाणार असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. तसेच 240Hz सँप्लिंग रेटसह हा फोन सादर केला जाईल. तसेच या फोनच्या प्रो व्हर्जनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी तर स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये 4300mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल. दोन्ही फोनची बॅटरी 64 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सध्या चीनमध्ये रियलमी X7 ची किंमत 19,290 रुपये इतकी आहे. या रक्कमेत 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस असलेलं व्हेरियंट सादर केलं जाईल. तसेच याची मेमरी एक्स्टर्नल मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल.
Realme X7 Pro चे फीचर्स
Realme X7 Pro 5G हा स्मार्टफोन Black आणि Gradient कलरमध्ये लाँच केला जाईल. 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरियंटमध्ये हा फोन लाँच केला जाईल. या फोनमध्ये Dimensity 1000+ प्रोसेसर दिला जाणार आहे. तर 6.55 इंचांचा अमोलेड डिस्प्ले दिला जाणार असून या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हार्ट्ज इतका असेल. या फोनला पॉवर देण्यसााठी 4500 mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच 64 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल, असे बोलले जात आहे.
हेही वाचा
दमदार फिचर्स असलेल्या Xiaomi, Nokia, Infinix च्या ‘या’ स्मार्टफोन्सना ग्राहकांची पसंती
18 मिनिटात 50 टक्के चार्ज होणार, Realme चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच
4820mAh ची बॅटरी, 108MP चा मेन कॅमेरा, Xiaomi चा नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त…
Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड, तक्रारींनंतर कंपनीने विक्री रोखली
यावर्षीच्या सुरुवातीलाच ढासू स्मार्टफोन्स लाँच होणार, फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धडाका
Realme X7 series India launch set for Feb 4, X7 Pro features confirmed on Flipkart)