6 सप्टेंबर रोजी भारतीय मोबाईल बाजारात एक मोठा इव्हेंट होणार आहे. रिअलमी (Realme) एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमादरम्यान स्मार्टफोन सोबतच कंपनी इयरबड्स (Realme Buds Air 3S) आणि एक स्मार्टवॉच (Realme Watch 3 Pro)देखील लॉन्च करेल. कंपनीने याबाबत सांगितले आहे, की एक स्मार्टफोन देखील कंपनीतर्फे सादर करण्यात येणार असून त्याचे नाव Realme C33 असेल. हा एक बजेट स्मार्टफोन असेल. या हँडसेटबाबत आतापर्यंत बरीच माहिती समोर आली आहे. Realme C33बद्दल कंपनीने सांगितले आहे, की यामध्ये 5000 mAh बॅटरी दिली जाईल. त्यामुळे स्मार्टफोनला मजबूत बॅटरी बॅकअप देण्यात मदत होणार आहे. मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा (Dual camera) सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. तंत्रज्ञान आणि विविध कलर्समध्ये हा हँडसेट उपलब्ध होणार आहे.
Realme C33च्या संदर्भात एक मायक्रोसाइड लँड करण्यात आला असून त्यामध्ये या आगामी मोबाइलच्या फीचर्सबद्दल सांगण्यात आले आहे. हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये नॉक करेल. त्यात, बॅक पॅनलवर मोठा कॅमेरा बंप वापरण्यात आला आहे. हा फोन 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल.
Realme C33 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, 37 दिवसांपर्यंत स्टँडबाय बॅकअप देऊ शकते. विशेष म्हणजे हा फोन अल्ट्रा पॉवर सेव्हिंग फीचर्ससह येतो, ज्यामुळे या फोनमध्ये अधिक बॅटरी बॅकअप देण्याची क्षमता आहे.
Realme C33 8.3 मिमी जाडीसह उपलब्ध होईल. त्याचे वजन 187 ग्रॅम आहे. हा फोन ब्लू, गोल्ड आणि ब्लॅक अशा तीन कलर व्हेरियंटमध्ये सादर होणार आहे. त्यात सॅंडी गोल्ड, एक्वा ब्लू आणि नाइट सी या व्हेरिएंटचा समावेश असणार आहे. Realme C33 चे स्टोरेज आणि RAM कॉन्फिगरेशन रिपोर्ट्सनुसार, Realme C33 तीन प्रकारांमध्ये ऑफर केला जाईल. त्यात, 3 जीबी + 32 जीबी, 4 जीबी + 64 जीबी आणि 4 जीबी + 128 जीबी कॉन्फिगरेशनसह नॉक करेल.