जिओची धमाकेदार ऑफर, रिचार्ज करा आणि मिळवा एक हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक

| Updated on: Feb 18, 2021 | 7:26 PM

जिओची धमाकेदार ऑफर, रिचार्ज करा आणि मिळवा एक हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक (Recharge jio no and get cashback up to one thousand rupees)

जिओची धमाकेदार ऑफर, रिचार्ज करा आणि मिळवा एक हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक
रिलायन्स जिओचे तीन सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान
Follow us on

मुंबई : नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर देणारी कंपनी जिओ आणखी एक धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना कॅशबॅक आणि रिवॉर्ड दोन्हीचा लाभ मिळणार आहे. कंपनीने ही ऑफर 16 फेब्रुवारीपासून सुरू केली असून ती 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. यात पेटीएम, फोन पे, अमेझॉन पे, मोबिक्विक सारख्या पेमेंट अ‍ॅप्समधून रिचार्ज केल्यावर कॅशबॅक आणि रिवॉर्ड दिले जात आहे. जिओ अॅप किंवा जिओ वेबसाईटवरुन रिचार्ज करणाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. याव्यतिरिक्त ग्राहकांना अन्य पेमेंट अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करावे लागेल. यात 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि 1000 रुपयांपर्यंत रिवॉर्ड मिळेल. या ऑफरची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…(Recharge jio no and get cashback up to one thousand rupees)

Paytm वर रिचार्ज केल्यास 1000 रुपये रिवॉर्ड

या ऑफरअंतर्गत ग्राहकांनी पेटीएमवरून जिओच्या क्रमांकावर रिचार्ज केल्यास त्यांना 100 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकेल. यात नव्या ग्राहकांना पहिल्या तीन रिचार्जवर लाभ देण्यात येणार आहे, तर जुन्या ग्राहकांना एक हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. ऑफरचा लाभ मिळविण्यासाठी 48 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीचे रिचार्ज करावे लागेल. पेटीएमकडून एक स्क्रॅच कार्ड बक्षीस म्हणून दिले जाईल, जे खरेदीसाठी वापरले जाऊ शकते.

फोन पे वर मिळवा 460 रुपयांपर्यंत लाभ

जिओच्या नवीन ग्राहकांना फोन पे रिचार्ज केल्यास 200 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक आणि सोबत 260 रुपयांचे स्क्रॅच अँड विन रिवॉर्ड मिळेल. यात 140 रुपयांचे कॅशबॅक दोन भागात दिले जाईल. पहिल्या रिचार्जवर 80 रुपये आणि दुसऱ्या-तिसऱ्या रिचार्जवर प्रत्येकी 60-60 रुपये कॅशबॅक मिळेल. ग्राहक या ऑफरचा लाभ युपीआय आयडीवरुन रिचार्ज केले तरच घेऊ शकतात आणि यासाठी किमान 125 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. याशिवाय जुन्या ग्राहकांना पहिल्या रिचार्जवर 120 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

अमेझॉन पे वर मिळवा 125 रुपये

अ‍ॅमेझॉन पेद्वारे रिचार्ज केल्यास 125 रुपयांचे बक्षीस मिळेल. ही ऑफर नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि अ‍ॅमेझॉनच्या पॉलिसीनुसार ग्राहक त्याचा वापर शॉपिंग किंवा बिल पेमेंटसाठी करू शकतात.

मोबिक्विकवर मिळवा 100 रुपये कॅशबॅक

जर तुम्ही मोबिक्विकवरुन रिचार्ज केले तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. यात जास्तीत जास्त 50 रुपये कॅशबॅक आहे, त्यासाठी नवीन ग्राहकांना ‘‘NJIO50’ कोड वापरावा लागेल. जुन्या ग्राहकांना ‘JIO50P’ कोडचा वापर करावा लागेल, यात 50 टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 149 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक युपीआय रिचार्ज करावे लागेल.

फ्रीरिचार्जवर मिळेल कॅशबॅक

फ्रीरिचार्जवर रिचार्ज केल्यास ग्राहकांना 30 रुपये कॅशबॅक मिळेल. यात नविन ग्राहकांना 30 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. यासाठी नविन ग्राहकांना ‘JIO30’ कूपन कोड टाकावे लागेल. तर जुन्या ग्राहकांना 20 रुपये कॅशबॅक मिळेल, यासाठी त्यांना ‘JIO20’ का कूपन कोड टाकावा लागेल. (Recharge jio no and get cashback up to one thousand rupees)

 

 

इतर बातम्या

Green Tea | ग्रीन टीमध्ये मिसळा ‘हे’ आयुर्वेदिक घटक, आरोग्याला होतील अनेक फायदे!

आधार क्रमांक बँक अकाऊंटला लिंक करा, अन्यथा पेंशन आणि एलपीजी सबसिडी होईल बंद