बाजारात Redmi 13C चे वादळ, स्वस्त स्मार्टफोनचे हे आहेत फीचर

| Updated on: Nov 30, 2023 | 10:17 AM

Redmi Smartphone | रेडमीच्या स्वस्त स्मार्टफोनची सध्या चर्चा रंगली आहे. मोबाईल प्रेमींची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. Xiaomi ने अधिकृत एक्स हँडलवरुन Redmi 13C हा बजेट फोन 6 डिसेंबर रोजी बाजारात उतरवणार असल्याचे सांगितले आहे. एका शानदार मोबाईलसाठी ग्राहकांनी तयार रहावे, असा दावा कंपनीने केला आहे.

बाजारात Redmi 13C चे वादळ, स्वस्त स्मार्टफोनचे हे आहेत फीचर
Follow us on

नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : iPhone नंतर बजेट स्मार्टफोनची चलती आहे. ग्राहक आकर्षक, दमदार बॅटरी, कॅमेरा असलेल्या बजेट फोनच्या शोधात आहेत. त्यात अनेक कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. धडाधड बजेट स्मार्टफोन बाजारात येत आहे. या स्पर्धेत Xiaomi ने त्यांना नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 13C उतरवण्याची तयारी केली आहे. या स्मार्टफोनचा लूक, विशेषतः कॅमेरा आणि त्याची किंमत याची चर्चा बाजारात रंगली आहे. ग्राहक या फोनच्या प्रतिक्षेत आहे. कंपनीने अधिकृत X हँडलवरुन Redmi 13C हा बजेट स्मार्टफोन पुढील आठवड्यात बाजारात दाखल होत असल्याचे जाहीर केले.

Redmi 13C ची क्रेझ

शाओमीने त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर यासंबंधीची एक पोस्ट केली आहे. Redmi 13C हा स्मार्टफोन 6 डिसेंबर रोजी बाजारात दाखल होत आहे. हटके लूक, परिपूर्ण नवकल्पनेसाठी तयार राहा, असा उल्लेख कंपनीने त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. Redmi 13C ची बाजारात आतापासूनच चर्चा रंगली आहे. बजेट फोनसाठी काही ग्राहकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

Redmi 13C ची वैशिष्ट्ये काय

Xiaomi ने आगामी Redmi फोनची मुख्य वैशिष्ट्ये सांगितली आहे. या हँडसेटची माहिती mi.com/in या संकेतस्थळावर ग्राहकांना पाहता येतील. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, हा हँडसेट दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्टारडस्ट ब्लॅक आणि स्टारशाईन ग्रीन या दोन रंगात हा मोबाईल न्हाऊन निघाला आहे.

कॅमेऱ्याची चर्चा

याशिवाय या फोनच्या कॅमेऱ्याविषयी मोबाईलमध्ये खास चर्चा आहे. Redmi 13C मध्ये 50MP AI कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर या हँडसेटची काही छायाचित्र देण्यात आली आहे. त्यात त्याचे खास डिझाईन लक्ष वेधून घेते. डिझाईन आणि डिस्प्लेवर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. मागील बाजूस दोन मोठे कॅमेरे, टॉपला एक कॅमेरा देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला दोन कॅमेरा सेन्सरची जोडी असेल.

Redmi 13C ची किंमत

पुढील आठवड्यात हा बजेट फोन बाजारात येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते हा फोन किफायतशीर असेल. Redmi 12C ची किंमत 6,799 रुपयांनी सुरु झाली होती. त्यामुळे आगामी Redmi 13C स्मार्टफोन सुद्धा याच रेंजमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता मोबाईल प्रेमींना तो बाजारात येण्याची प्रतिक्षा लागली आहे. त्याविषयीची माहिती ते इंटरनेटवर शोधत आहेत.