ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत…

| Updated on: Feb 22, 2021 | 5:22 PM

Redmi 9 Power या स्मार्टफोनचं 6 जीबी रॅम वेरिएंट भारतात लाँच करण्यात आलं आहे. (Redmi 9 Power 6 GB RAM variant)

ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत...
Follow us on

मुंबई : Redmi 9 Power या स्मार्टफोनचं 6 जीबी रॅम वेरिएंट भारतात लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. यापूर्वी Redmi चा हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम ऑप्शनसह लाँच करण्यात आला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा फोन लाँच करण्यात आला होता. नवं वेरिेएंट सादर करताना कंपनीने म्हटलं आहे की, त्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन Redmi 9 पॉवर वेरिएंट सादर केलं आहे. (Redmi 9 Power 6 GB RAM variant launched in India know price and specification)

रॅम क्षमता वाढवण्याशिवाय कंपनीने नव्या रेडमी फोनच्या हार्डवेअरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. याचाच अर्थ हा फोन अगोदरच्या फोनप्रमाणेच फुल-एचडी + डिस्प्ले, ऑक्टा-कोर SoC आणि 48-मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह मिळेल. भारतात नव्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लेजिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेरी रेड आणि मायटी ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

रेडमी 9 पॉवर च्या 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजवाल्या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये इतकी आहे. तर 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. स्मार्टफोन ब्लेजिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेयरी रेड आणि मायटी ब्लॅक कलर मध्ये मिळणार आहे. हा फोन अॅमेझॉन आणि Mi.com वर ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच एमआय होम्स स्टूडियोज आणि मी स्टोर्सवर ऑफलाइन उपलब्ध आहे आहे.

फीचर्स

ड्यूल सिम सपोर्टेड रेडमी 9 पॉवर हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 वर चालतो. फोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप स्क्रीन दिली आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 इतका आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 3 देण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

ट्रिपल कॅमेरा

रेडमी 9 पॉवर मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा मायक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

4GB/64GB, ट्रिपल कॅमेरासह दमदार फीचर्स, Nokia चा बजेट फोन बाजारात

5000mAh बॅटरी, 6.5 इंच डिस्प्ले, किंमत अवघी 7499, Moto चा दमदार स्मार्टफोन लाँच

Samsung, Oneplus, Xiaomi, Apple च्या स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट

(Redmi 9 Power 6 GB RAM variant launched in India know price and specification)