Xiaomi कंपनीच्या रेडमीने बाजारात दोन झक्कास स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. स्मार्टफोन बाजारात महिन्याला एक ना एक हटके मोबाईल येतोच. वाढती स्पर्धा, अत्याधुनिक फीचर्स, तंत्रज्ञान पाहता रेडमीने ‘K80’ सीरीज बाजारात आणली आहे. मोबाईल प्रेमींसाठी आता लेटेस्ट स्मार्टफोन आला आहे. या फोनच्या दमदार बॅटरीची बाजारात चर्चा आहे. तर इतर फीचर्स पण तरुणाईने डोक्यावर घेतले आहे. किती आहे या स्मार्टफोनची किंमत?
Redmi K80 ची वैशिष्ट्ये काय?
1.कंपनीने Redmi K80 आणि Redmi K80 Pro बाजारात आणला आहे. Redmi K80 मध्ये 50 मेगापिक्सल लाईट फ्यूजन 800 OIS सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला 20-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ड्यु्अल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
2.Redmi K80 स्मार्टफोन Android 15 वर मक्कन सारखा चालेल. HyperOS 2 ने हे काम सोप्पं होणार आहे. हा स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर 4-नॅनोमीटर फॅब्रिकेशनची चलती आहे. त्याच्यामुळे या फोनचा स्पीड वाढला आहे. चीनमध्ये हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 16GB रॅम आणि 256GB, 512, GB आणि 1TB स्टोरेजमध्ये विक्री होईल.
3.या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. तो OLED पॅनेलवर तयार करण्यात आला आहे. Redmi K80 मध्ये 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
4.या स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी शक्तिशाली 6,550mAh बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. 90-वॉट फास्ट चार्जिंगमुळे तो जलद चार्ज होतो. हा स्मार्टफोन चार रंगात उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्नो रॉक व्हाइट, माउंटन ग्रीन, मिस्ट्रियस नाईट ब्लॅक आणि ट्वायलाईट मून ब्लू या रंगात तो उपलब्ध आहे. 12GB रॅम + 256GB ते 16GB RAM + 1TB स्टोरेजमधील हा स्मार्टफोन भारतीय चलनात 29 हजार ते 42 हजार रुपयांच्या घरात असेल. त्यात पाच स्टोरेजची व्हेरिएंट उपलब्ध करून देण्यात आली आहेत.