Redmi A1 | आपल्या बजेट स्मार्टफोनच्या प्रोडक्शनसाठी रेडमी कंपनी ओळखली जाते. बजेटमध्ये एकापेक्षा एक चांगले फीचर्स मिळत असल्याने रेडमीच्या फोन्सची सर्वाधिक विक्री होत असते. आता ज्यांना पुन्हा एखादी बजेट स्मार्टफोन हवा असेल त्यांच्यासाठी हा आठवडा खास असणार आहे. रेडमीचा (Redmi) नवीन स्मार्टफोन या आठवड्यात लॉन्च होणार आहे. या अपकमिंग बजेट स्मार्टफोनची किंमत 8000 रुपयांपेक्षाही कमी असेल. रेडमी ए 1 (Redmi A1) नावाचा हा मोबाईल भारतात 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सादर केला जाईल. शाओमीने (Xiaomi) आपल्या आगामी स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाइट तयार केली आहे, ज्यामध्ये त्याने काही स्पेसिफिकेशनची माहिती शेअर केली आहे. अपकमिंग बजेट स्मार्टफोन रेडमी ए1 मध्ये मीडियाटेक प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये सादर केला जाईल. यामध्ये बॅक पॅनलवर हार्ड प्लास्टिक वापरण्यात येणार आहे.
शाओमीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल माहिती दिली आहे. शाओमीने ट्विटमध्ये म्हटले आहे, आगामी मोबाईल क्लीन सॉफ्टवेअरसह नॉक करेल, त्यामुळे याचा अर्थ कंपनी यात स्टॉक अँड्रॉइडचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शोओमीने A सीरीज अंतर्गत येणाऱ्या फोनमध्ये स्टॉक अँड्रॉइडचा वापर केला असला तरी या माहितीला कंपनीने दुजोरा दिलेला नाही.
कंपनीने सांगितले आहे, की हा मेड इन इंडिया स्मार्टफोन आहे आणि तो भारतातच तयार केला जात आहे. मात्र, यात कोणता प्रोसेसर वापरला जाईल याची माहिती कंपनीने अद्याप शेअर केलेली नाही. अलीकडेच हा मोबाइल Geek bench वर दिसला आहे, हा स्मार्टफोन MediaTek Helio A22 चिपसेटवर काम करतो.
कंपनीने बऱ्याच काळापासून बजेट सेगमेंटमध्ये आपला कोणताही स्मार्टफोन लॉन्च केला नव्हता आणि आता हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. Redmi 10A, Redmi 9i Sport आणि Redmi 9i Active फोन या सेगमेंटमध्ये आधीच सादर करण्यात आले आहेत.
रेडमी (Redmi) आपला नवीन स्मार्टफोन भारतीय मोबाइल बाजारात दाखल करणार आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव रेडमी नोट 11 एसई (Redmi Note 11SE) ठेवण्यात आले आहे. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या अपकमिंग मोबाईलबद्दल आतापर्यंत बरीच माहिती समोर आली आहे. लिक झालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये दमदार कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच अनेक अत्याधुनिक फीचर्सही (features) देण्यात आली आहेत. दरम्यान, अजून एका माहितीनुसार कंपनी या मोबाईलसोबत चार्जर अॅडॉप्टर आणि केबल देणार नसल्याची माहिती आहे.