48MP कॅमेरावाला नवीन Redmi Note 10 अवघ्या 11,999 रुपयात खरेदी करण्याची संधी

| Updated on: Mar 23, 2021 | 11:44 AM

Redmi Note 10 सिरीजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन Redmi Note 10 खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आज मिळणार आहे.

48MP कॅमेरावाला नवीन Redmi Note 10 अवघ्या 11,999 रुपयात खरेदी करण्याची संधी
Redmi Note 10
Follow us on

मुंबई : Redmi Note 10 सिरीजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन Redmi Note 10 खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आज मिळणार आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max सह या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता. आज या फोनचा सेल आयोजित करण्यात आला आहे. या फोनचा सेल यापूर्वीदेखील झाला आहे. हा याचा दुसरा सेल आहे. (Redmi Note 10 second sale today in India, know price specs)

Redmi Note 10 च्या 4GB + 64GB वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आणि 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून शाओमीच्या ऑफिशियल साईटवर अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर, एमआय होम आणि रिटेल स्टोर्सवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल. याआधीच्या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणीमुळे अमेझॉनची साइट क्रॅश झाली होती. तसेच त्यावेळी या फोनचं बेस वेरिएंट उपलब्ध केलं नव्हतं. तथापि, यावेळी बेस वेरिएंटची विक्री केली जाईल.

रेडमी नोट 10 अॅक्वा ग्रीन, फ्रॉस्ट व्हाईट आणि शॅडो ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांमध्ये ग्राहकांना एक हजार रुपयांपर्यंतची सवलत देखील मिळू शकेल. त्याचबरोबर शाओमीच्या साइटवर ग्राहकांना MobiKwik द्वारे पेमेंट केल्यावर 400 रुपयांचा कॅशबॅकही मिळेल.

फीचर्स

ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह हा रेडमी नोट 10 अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 वर चालतो आणि 6.43 इंच फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा पीक ब्राइटनेस 1100 nits पर्यंत आहे. या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. याची बॅटरी 5000 एमएएच असून 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग देखील सपोर्टेड आहे. तसेच, त्यात एक झेड-अॅक्सिस वायब्रेशन मोटर आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी पर्यंतचा LPDDR4x रॅम आणि Adreno 612 GPU सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी 48 एमपी प्रायमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 एमपी मॅक्रो कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

इतर बातम्या

Redmi Note 9 सिरीजमधील सर्व स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट, कमी किंमतीत ढासू फीचर्स मिळणार

12GB/256GB, 64MP कॅमेरा, Moto G100 स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज

पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

(Redmi Note 10 second sale today in India, know price specs)